व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 645

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ६०३

बिस्मार्क, ऑटो फोन :--(१ एप्रिल १८१५ - ३० जुलै १८९८). जर्मन साम्राज्याचा जनक आणि जर्मनीचा पहिला चॅन्सेलर. याचा जन्म सेंकसनीतील शनहाऊझेन येथे सरंजामदार घराण्यात झाला. वडील फर्डिनांट फोन बिस्मार्क-शनहाऊझेन आणि आई व्हिल्हेल्सीन मेन्‌केम, फर्डिनांटना राजकारणात रस नव्हता; तथापि त्याची आई प्रगत विचारांची व महत्त्वांकाक्षी होती. बिस्मार्कने गटिंगन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. (१८३५). . लष्करी शिक्षणाची त्याला फारशी आवड नव्हती. आईच्या मध्यस्थीने त्याला एक्स-ला-शपेल येथे शासकीय विधिखात्यात नोकरी मिळाली; परंतु आत्यंतिक आळशी व उच्छृंखल स्वभावामुळे ती त्यास सोडावी लागली. त्यानंतर पॉट्स डॅम येथे त्यास दुसरी नोकरी.मिळाली. ती ही त्यांनी सोडली. नंतर बिस्मार्क विलासी जीवन व्यतीत करू लागला. त्याने योहान्ना 'पुटकामर फोन या सरदार घराण्यातील युवतीशी विवाह केला (१८४७). एका सदस्याच्या अनुपस्थितीत बिस्मार्कने प्रशियाच्या संसदेत त्याचे प्रतिनिधित्त्व केले (१८४७). . पुढे १८४९ मध्ये तो कनिष्ठ गृहावर निवडून आला. १८५१-१८५८ दरम्यान त्याने जर्मन संस्थांनाच्या फ्रैंकफुर्ट येथील प्रातिनिधिक संस्थेत (फेडरल डायेट) प्रशियाचा प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यामुळे त्यास संसदीय कामकाजाचा अनुभव मिळाला. १८५९ साली त्याची नेमणूक प्रशियाचा रशियातील वकील म्हणून झाली. रशिया व प्रशिया यांच्यातील संबंध सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला. १८६२ मध्ये बिस्मार्कची प्रशियाचा राजदूत म्हणून फ्रान्समध्ये नेमणूक झाली, चौथ्या फ्रेडरिक विल्यमच्या मृत्यूनंतर (१८६१) पहिला विल्यम प्रशियाच्या गादीवर आला. त्याच्या सैनिकी कार्यक्रमाच्या अधिनियमास संसदेचा विरोध होता. यां परिस्थितीत १८६२ मध्ये बिस्मार्कला पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री नेमण्यात आले. प्रशियन संसदेशी टक्कर देण्यास समर्थ असा बिस्मार्कखेरीज दुसरा मुत्सद्दी नाही, याची जाणीव विल्यमला झाली होती. १८६२ ते १८७० ह्या काळात बिस्मार्क प्रशियाचा पंतप्रधान आणि १८७१ ते १८९० ह्या काळात जर्मनीचा चॅन्सेलर होता.

बिस्मार्क हा राजेशाहीचा पुरस्कर्ता व हुकूमशाही प्रवृत्तीचा होता. साहजिकच नव्यानेच उदयास येत असलेल्या समाजवादाच्या तो विरोधी होता. जर्मनीच्या विकासासाठी :त्याने समान कायद्याची निर्मिती केली व समान चलनव्यवस्था अंमलात आणली. १८७५ च्या बँक कायद्यानुसार देशातील बँकांचे नियंत्रण जर्मन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाकडे (बुनडेस्टाख) सोपविण्यात आले आणि १८७६मध्ये राइख बँक किंवा इंपिरिअल बँकेची स्थापना करण्यात आली. रेल्वे मार्गाचे व्यवस्थापकीय एकीकरण, बँक व्यवसायातील सुधारणा आणि सक्तीची