डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ६०४
कामगारांच्या सैन्यभरती या सुधारणांमुळे अंतर्गत शासनात कार्यक्षमता वाढली. परिस्थितीत सुधारणा व्हावी व त्यांनी समाजवादी पक्ष व त्यांची विचारसरणी
अनेक यांकडे आकर्षित होऊ नये, म्हणून बिस्मार्कने कामगारांच्या हिताचे कायदे संसदेत संमत करून घेतले. त्यात अपघात व आजारपण यांत कामगारांना आर्थिक सहाय्य, कामाचे विशिष्ट तास, स्त्री-कामगार व बाल-कामगार यांना संरक्षण यांसंबंधीचे कायदे महत्त्वाचे होते. या सुधारणांबरोबरच जर्मन उद्योगधंद्यांना उत्तेजन व संरक्षण देण्याचे धोरण त्याने अंगीकारले, जर्मन मालाला बाजारपेठ मिळावी, तसेच कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा, म्हणून जर्मनीसाठी वसाहती मिळवण्याचा प्रयत्नही त्याने केला. रोमन कॅथलिक चर्चचा जर्मन राष्ट्रवादाला विराध होता. याकरिता रोमन कॅथलिक चर्चबरोबर त्याने संघर्षाचे धोरण अवलंबिले. त्याने जेझुइटांना हाकलून दिले, व्हॅटिकनबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले आणि कायदे करून चर्चवरील शासकीय प्रभाव वाढविला; परंतु त्याच्या या धोरणाला चर्चने व कॅथलिकांच्या मध्यवर्ती - संस्थेने जोरदार विरोध केला. त्यामुळे या धोरणाला फारसे यश लाभले नाही. एवढेच नव्हे, तर चर्चच्या विरोधातील बहुसंख्य कायदे पुढे मागे घेण्यात आले. १८८८ मध्ये गादीवर आलेल्या जर्मन सम्राट दुसऱ्या विल्यम कैसरबरोबर बिस्मार्कचे मतभेद निर्माण झाले. परिणामतः १८९० मध्ये बिस्मार्कला राजीनामा देणे भाग पडले. निवृत्तीनंतर काही वर्षांनी तो बलिन येथे मरण पावला.
बिस्मार्कचे परराष्ट्रीय धोरण अंतर्गत धोरणाशी काही अंशी संलग्न होते. तरीही प्रखर बुद्धिवाद. व व्यापक दृष्टिकोण ह्यांमुळे ह्या काळात बिस्मार्क प्रशिया - जर्मनी यांच्या कक्षा ओलांडून यूरोपीय मुत्सद्दी झाला. १८६२ ते १८६६ पर्यंत
प्रशियन, १८६६ ते १८७० पर्यंत जर्मन व १८७० नंतर तो युरोपीय मुत्सद्दी होता. त्याच्या प्रगल्भ दृष्टिकोनानुसार त्याचे परराष्ट्रीय धोरण बदलत गेले. त्याने आपल्या परराष्ट्रीय धोरणाला लष्करी सामर्थ्याची सदैव जोड
दिली.
संसदेशी टक्कर देताना बिस्मार्कने १८६२ मध्ये आदर्शवादी लोकांचा पराभव केला; परंतु राष्ट्रीय चळवळीला कमी लेखले नाही. लोकशाही प्रधान राज्य आणि जर्मनीचे एकीकरण या दुहेरी मागणीतील एकीकरणाच्या प्रवृत्तीस त्याने
प्रोत्साहन दिले. त्यामुळे आदर्शवादी लोकांचा विरोध झाला; तरी सर्वसामान्य जनता त्याच्या विरुद्ध नव्हती. एकीकरणासाठी फ्रान्सशी युद्ध अटळ होते व
ऑस्ट्रियाशी संभवनीय होते. जर्मन लोकांवर ऑस्ट्रियाचे असलेले वजन दुर