व्यक्ती, संस्था, कार्य--सूची ६०५
करण्यासाठी कुठल्याही साधनांचा वापर करण्यास बिस्मार्क तयार होता. युद्ध हेही त्याच्या राजनीतीतील एक साधन होते आणि ते त्याने वापरले. श्लेझविग व होलस्टाइन ह्या औत्तरीय प्रांतावर असलेले डेन्मार्कचे वर्चस्व जर्मन राष्ट्रवाद्यांना जाचक होते. ह्याचा उपयोग करून बिस्मार्कने ऑस्ट्रियास आपल्याशी मैत्री करणे भाग पाडले आणि ह्या प्रांताचा कबजा मिळविला. प्रशियाने एकट्यानेच जर्मन राष्ट्रवादी भूमिका घेऊन जर्मनीमध्ये वर्चस्व मिळवू नये, म्हणून ऑस्ट्रियास प्रशियाशी संगनमत करणे भाग पाडले. ऑगस्ट १८६५ मध्ये गास्टाइनच्या करारान्वये आँस्ट्रियाने होलस्टाइन आणि प्रशियाने श्लेझविग प्रांत ताब्यात घ्यावा असे ठरले; परंतु ऑस्ट्रियाशी युद्ध हे अनेक कारणांनी अटळ होते. जर्मनीचे नेतृत्त्व प्रशियाकडे असावे की ऑस्ट्रियाकडे हा मूलभूत प्रश्न लष्करी सामर्थ्यानेच सुटणारा असल्याने बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध पुकारले. त्यासाठी त्याने इटलीशी तह करून ऑस्ट्रियाच्या ताब्यातील व्हिनीशिया मिळवून देण्याचे वचन दिले. ह्या तहामुळे ऑस्ट्रियाचे प्रचंड सैन्य इटलीत गुंतून पडले. प्रत्यक्षात प्रशियन लबष्करीव्यवस्था ही ऑस्ट्रियापेक्षा अधिक कार्यक्षम ठरली, १४ जून १८६६ रोजी युद्ध पुकारले गेले. ३ जुलैला दोन्ही सैन्यांची कनिखग्रेटस येथे गाठ पडून ऑस्ट्रियाचा संपूर्ण पराभव झाला. जर्मनीतील प्रशियाचे नेतृत्त्व वादातीत झाले. शलेझविग-होलस्टाइन प्रांत प्रशियास मिळाले.
जर्मनीच्या एकीकरणात फ्रान्सशी युद्ध अटळ होते. एक प्रबळ व महत्त्वाचे यूरोपीय राष्ट्र म्हणून फ्रान्सला यूरोपीय समस्यांमध्ये रस होताच; शिवाय जर्मनीचा प्रदेश फ्रान्सच्या सीमेला भिडत असल्याने व जर्मनीचे अँल्सेस व लॉरेन्स हे दोन - प्रांत फ्रान्सकडे असल्याने फ्रान्सचे बारीक लक्ष जर्मनीच्या धोरणावर होते. युद्ध अटळ असल्यास ते कुशलतेने घडवून आणावे, हे धोरण बिस्मार्कचे होते. स्पेनच्या गादीवर कुणी बसावे, ह्या प्रश्नावरून वातावरण तंग होऊन त्याची परिणती १८७० च्या फ्रान्स व प्रशिया यांमधील युद्धात झाली. या युद्धात फ्रान्सचा दारुण पराभव झाला. १८ जानेवारी १८७१ रोजी व्हर्सायच्या आरसेमहालात बिस्मार्कने जर्मन साम्राज्य अस्तित्वात आल्याची घोषणा केली.
मध्य यूरोपात १८७१ पासून पुढे जैसे थे परिस्थिती कायम राखणे, हे बिस्मार्कच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते; कारण ती स्थिती नवोदित जर्मनीच्या विकासाच्या दृष्टीने हिताची होती. पराभूत फ्रान्सला यूरोपात अलग पाडण्यावरच त्याच्या धोरणाची यशस्विता अवलंबून होती. फ्रान्सचे संभाव्य मित्र ऑस्ट्रिया व रशिया होते; परंतु अशी मैत्री होण्यापूर्वीच बिस्मार्कने या दोन्ही देशांशी १८७३ मध्ये युती केली (त्रिसम्राट संघ). १८७९ मध्ये ऑस्ट्रियाबरोबर स्वतंत्र युती
वाय ६४१-४१