६०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
केली, तर १८८२ मध्ये त्याने ऑस्ट्रिया, इटली आणि जर्मनी यांच्यात युती घडवून आणली (त्रिराष्ट्र-करार). १८८७ मध्ये त्याने रशियाबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न केला; कारण तत्पूर्वी त्रिसम्राट संघ भंग पावला होता. याशिवाय ब्रिटनबरोबर संघर्ष येऊ न देण्याची दक्षता त्याने घेतली होती. एकूण १८७१ पासून तो सत्तेवर असेपर्यंत (१८९०) फ्रान्सला मित्र मिळू न देण्यात व अलग पाडण्यात बिस्मार्कचे धोरण यशस्वी झाले, असे म्हणता येईल.
एकोणिसाव्या शतकात विशेषतः १८१५ ते १८६२ दरम्यान वेगवेगळ्या लहानमोठ्या राज्यांत विखुरलेल्या जर्मन लोकांच्या राजकीय ऐक्याचे अनेक प्रयत्न झाले; पण ते अयशस्वी ठरले. सत्तेवर आल्यानंतर दहा वर्षाच्या आतच बिस्मार्कने त्याच्या पद्धतीनुसार जर्मनांचे एकीकरण घडवून आणले आणि फ्रंको- प्रशियन (जर्मन) युद्धाने जर्मनी या आधुनिक राष्ट्राचा उदय झाला. त्यामुळे आधुनिक जर्मनीचा तो शिल्पकार ठरला. जर्मनी हे यूरोपातील लष्करी दृष्ट्या एक बलवत्तर राष्ट्र झाले आणि जागतिक राजकारणात त्याची प्रतिमा उंचावली; परंतु बिस्मार्कच्या युद्धखोर व अधिकारशाही विचारसरणीमुळे जर्मनीत लोकशाहीची बीजे दीर्घ काळ रूजू शकली नाहीत. एवढेच नव्हे तर विसाव्या शतकात ` जर्मनीने जे युद्धखोर व विस्तारवादी धोरण स्वीकारून जगाला ज्या दोन जागतिक महायुद्धांच्या खाईत लोटले, त्याची बीजेही बिस्मार्कच्या कारकीर्दीतच पेरली गेली.
भागवत, राजारामशास्त्री रामकृष्ण (१८५१-१९०८) :-महाराष्ट्रीय संस्कृत पंडित, व्यासंगी वेदाभ्यासक व सुधारक. राजापूर तालुक्यात केळशी गावी जन्म. मुंबईत शिक्षण. संस्कृतचे अनेक वर्षे प्राध्यापक. मुंबई विद्यापीठात शेवटची ५-६ वर्षे संस्कृतचे परीक्षक. निर्भीड वृत्ती. अस्पृश्यांच्या उन्नतीविषयी खूय कळकळ. स्वतंत्र विचारांमुळे अतिविक्षिप्त म्हणून कीर्ती. वेद, विविध धर्म, इतिहास, संत कवी, भागवत संप्रदाय, व्याकरण इत्यादि नाना विषयांचा मूलगामी अभ्यास. अनेक लेखांचे व ग्रंथांचे लेखन.
भोपटकर, लक्ष्मण बळवंत :-जन्म १८८० मध्ये. प्रसिद्ध 'भाला' कार भोपटकर यांचे कनिष्ट बंधू. नामांकित वकील, अनेक ग्रंथांचे लेखक, वृत्तपत्रांचे संपादक. सार्वजनिक, राजकीय तथा सामाजिक चळवळीत प्रत्यक्ष भाग, राजकीय मतस्वातंत्र्याबरोबरच सामाजिक मतस्वातंत्र्यही असावे या विचाराचे. १९०५ सालापासूनच अस्पृश्यता-निवारणाच्या विषयावर लिहिणे व बोलणे सुरू होते. त्यावेळीच नागपुरातील प्रतिष्ठा पावलेल्या एका अस्पृश्य