व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ६०७
पुढाऱ्यास बोलावून पुणे येथे त्याचे व्याख्यान करविले. श्री. माटे यांच्या अस्पृश्यता निवारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. विद्याभ्यास सुरू असताना कुस्ती, दांडपट्टा, देशी व्यायाम-पद्धती व खेळ यांचे ज्ञान त्यांनी संपादन केले. पुण्यातील महाराष्ट्र व्यायाम शाळा त्यांनीच भरभराटीस आणली. तसेच महाराष्ट्र विद्यालय या नावाचे राष्ट्रीय हायस्कूल या बंधूंनी काढले. १९०५ साली “भाला' कार भोपटकर यांना राजद्रोहाबद्दल शिक्षा झाल्यावर त्यांनी काही काळ “भाला' पत्राचे संपादन केले. “लोकसंग्रह” या दैनिकाचे ते दोन वर्षे संपादक होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे चार वर्षे अध्यक्ष होते. पूना लॉ कॉलेज सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेऊन ते त्या कॉलेजात कायद्याचे प्रोफेसर होते व व्हॉईस प्रिसिपाल पण होते. त्यांनी ‘Law of Torts’ इ. कायद्याची. पुस्तके, दांडपट्टा, कुस्ती ही व्यायामविषयक पुस्तके, नवरत्नाचा हार, मृत्यूच्या मांडीवर इ. पुस्तके लिहिली.
मोझेस :-(इ. स. पू. सु. चौदावे - तेरावे शतक). ज्यू राष्ट्रसंस्थापक, सर्वश्रेष्ठ ज्यु प्रेषित व ज्यूंना त्यांची धार्मिक-नैतिक-सामाजिक संहिता देणारा एक श्रेष्ठ नेता. मोझेस (हिब्रु - मोशे) हा शब्द ईजिप्शियन भाषेत मोसे म्हणजे मुलगा या अर्थाचा आहे. त्याचा जन्म ईजिप्तमध्ये झाला. मोझेसचा पिता अम्राम व आई जोशेबेद. हे दोघेही लेव्ही जमातीचे ज्यू होते. परंतु ज्या दुसरा रॅमसीझ (इ. स. पू. सु. १३०४ - १२३७) ह्या ईजिप्ती राजाच्या (फेअरो) राज्यात ते गुलाम म्हणून राहत होते, त्याने ज्यूंच्या मुलांना नाईल नदीत बुडवून मारावे असा हुकूम काढला होता. मोझेसला त्याच्या आईवडिलांनी तीन महिने कसेतरी ' गुप्तपणे सांभाळले; परंतु शेवटी त्यांनी त्याला गवताच्या पेटाऱ्यात ठेवून नाईल नदीत सोडून दिले. सुदैवाने फेअरोची राजकन्या नदीवर आंघोळीस आली असता तिला हे मूल आढळले व ते तिला इतके आवडले की, तिने त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे पालनपोषण केले व त्याचे नाव मोझेस असे ठेवले, मोझेस मोठा झाल्यावर एकदा त्याने एक ईजिप्शियन माणूस एका ज्यूचा छळ करीत असताना पाहिले. लगेच त्याने त्या माणसास ठार केले. मोझेसच्या रक्ताला हा गुण उत्तरोत्तर अधिक प्रगट होऊ लागला. फेअरोच्या हाती सापडण्यापूर्वीच तो तेथुन पळाला व we ह्या मीडियनच्या घर्मगुरूकडे आला. तिथे त्याने त्या धर्मगुरूची मुलगी झिप्पोरा हिच्याशी लग्न केले. तिला मोझेसपासून जेरशोम व एलिएझर हे दोन पुत्रही झाले. तिथेच मोझेसने चाळीस वर्षे मेंढपाळाचा व्यवसाय केला. एकदा होरेब पर्वतावर मेंढ्या चारीत असता मोझेसला एका झुडपात अग्निज्वाला