६०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दिसली आणि तरीही ते झुडूप जळत नव्हते. तो जवळ गेला तेव्हा त्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला व ईजिप्तला परत जाऊन आपल्या भाऊबंदांना सोडवून आणण्याचा परमेश्वरी आदेश मिळाला. त्याप्रमाणे तो ईजिप्तला आला. तिथे त्याला त्याचा भाऊ एअरन भेटला, ज्यूंना सोडून देण्यासाठी फेअरोचे मन वळविणे कठीण आहे असे दोघा भावांना पटले. मग मोझेसच्या दैवी शक्तीमुळे येहोवाने ईजिप्तवर दहा वेळा प्लेगच्या साथी आणल्या. शेवटी ईजिष्श्यिन लोकांनी ज्यूंचा छळ थांबवून त्यांना सोडून दिले. मग सारे ज्यू आपली मेंढरे घेऊन सुएझच्या दक्षिणेकडे वसाहत करण्यासाठी निघाले. त्यांचे नेतृत्व मोझेसने केले. हा प्रसंग 'एक्झोडस'म्हणून बायबलमध्ये व इतिहासातही प्रख्यात आहे. त्यांच्यावर अनेक संकटे आली; पण त्यांना ईश्वराने-येहोवाने सांभाळले. सिनाई येथे सारे आले तेव्हा त्यांचे मोठे स्वागत झाले. इथेच या पर्वताच्या शिखरावर (जेबेल मूसा) मोझेसला ईश्वरी साक्षात्कार झाला व ईश्वराने त्याला आपल्या 'दशाज्ञा' वा दहा नितिनियम दिले. सिनाई पर्वतावर मोझेस vo दिवस ईश्वराच्या सान्निध्यात होता. नंतर खाली येऊन त्याने आपल्या भाईबंदाना कादेश येथे नेले. तेथून ३८ वर्षानंतर ते पूर्वेकडे निघाले. एसौ व मोआब यांच्या प्रदेशातून त्यांना सुखरूपपणे जाता आले; परंतु पुढे त्यांच्या मार्गात प्रतिबंध आला, जॉर्डन नदी ओलांडून पलीकडे कॅनन प्रदेशात जाता येणार नाही व आपला अंतकाळही जवळ येऊन ठेपला आहे असे पाहून मोझेसने आपल्या साऱ्या बांधवांना बोलावून त्यांना शेवटचा संदेश दिला ('ड्यूटेरोनॉमी' वा पेंटाट्यूक' या नावाने ओळखल्या जाणाऱया बायबलमधील पहिल्या पाच पुस्तकांत हा संदेश ग्रथित आहे). नंतर सर्वाना आशीर्वाद देऊन तसेच जोशुआस आपला वारस नियुक्त करून मोझेस नेबो पर्वतावरील पिसगाह शिखरावर गेला व तिथे त्याने वयाच्या एकशेविसाव्या वर्षी देह ठेवला. इ. स. पू. सु. १३९२ ते सु. १२७२ असा त्याचा आयुकाल अभ्यासक मानतात.
ज्यू धर्माप्रमाणे येहोवाने इझ्राएल राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोझेसला प्रेषित बनविले होते व त्याच्या द्वारा ईश्वर आपल्या सार्या आज्ञा ज्यू जनतेला कळवीत राहिला. मोझेस हा स्वभावाने अत्यंत शांत होता, असे त्याचे वर्णन आढळते. ज्याने ईश्वराला समोरासमोर पाहिले असा धर्मप्रेषित एकटा मोझेसच होय”, अशी त्याची थोरवी गायिली जाते. ज्या काळात मोझेसने आपल्या बांधवांची एको घडवून आणली त्या काळात येहोवा या देवाचा नाममहिमा नुकताच सुरू झाला होता. अशा काळात मोझेसच्या प्रयत्नांमुळे ज्यू जनतेने या ईश्वरावर श्रद्धा ठेवली, "सिनाई पर्वतावरून जे वादळ आले त्यामुळे साऱ्या वाळवंटावर