व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 651

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ६०९

यावसाचा वर्षाव झाला व जिकडे तिकडे पिके डवरून आली ', या त्यांच्या उद्गारावरून मोझेसने ज्या ईश्वरावर त्यांना श्रद्धा ठेवायला सांगितली, त्याने अनेक चमत्कार केल्याच्या कथा आहेत. मोझेस खरोखरच त्यांना मदत करणारा ठरला. मोझेसची खरी कीर्ती त्याने घालून दिलेल्या नियमांमुळे विशेष झाली आहे. मोझेसच्या ङ्यूटेरोनाँमीतल्या नियमांमुळे ज्यू लोकांची एको झाली, त्यांच्यात राष्ट्रीय भावना निर्माण झाली; इतकेच नव्हे, तर धर्माची खरी कसोटी विधी आणि पूजा यांवर अवलंबून नसून नैतिक आचरणावर आहे, हा दृष्टिकोन त्यांना प्रथम मोझसकडून मिळाला.

मायकेलअंजेलो या प्रसिद्ध कलावंताने तयार केलेल्या मोझेसच्या पुतेळ्यात मोझेसच्या कपाळातून शिगे बाहेर आलेली दाखविली आहेत. मोझेसच्या कपाळावरील शिंगाची कल्पना मूळ हिब्रूवरून लॅटिनमध्ये झालेल्या चुकीच्या माषांतरामुळे आली आहे. 'जेव्हा मोझेस सिनाई पर्वतावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या चेहेस्यावरील कातडी चमकत होती ' या बायबलच्या वाक्यातील मूळ हिब्रतील “चमकत होती ' या अर्थाचा शब्दप्रयोग (तिच्यातून) किरणे निघत होती ' असा आहे. लेॅटिनमध्ये 'किरण' व ‘Rev यांचा घोटाळा केला गेला. मोझेसच्या जीवनातील प्रसंगांवर अनेक प्रख्यात चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी आपल्या चित्र-शिल्पाकृती तयार केल्या आहेत.

रामकृष्ण परमहंस (१८३६-१८८६). :-बंगालमधील जगप्रसिद्ध सिद्धपुरुष व वेदान्तप्रतिपादक. बंगाल्यात हुगळी जिल्ह्यात कामारपुकुर येथे जन्म, मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय. यांचे आई-वडिल अत्यंत धार्मिक व सनातनी वृत्तीचे ब्राह्मण होते. १८५३ मध्ये हे आपले वडिलबंधू रामकुमार यांचे बरोबर कलकत्त्यास आले. १८५६ मध्ये राणी रासमणीने यांच्या वडील भावाला कलकत्त्याजवळच्या कालीच्या दक्षिणेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी नेमले. हे त्यांना मदत करीत. यावेळी तोतापुरी नावाच्या एका सन्यासाने त्यांना सन्यास देऊन त्यांचे नाव रामकृष्ण परमहंस ठेविले. नंतर त्यांनी खिश्चन व मुसलमान धर्माची त्या त्या धर्मातील अनुयायाप्रमाणे उपासना केली. तसेच निरनिराळे संप्रदाय व मतामतान्तरे यांचा आस्तिकपणे अभ्यास करून तद्नुसार यानी काही दिवस साधनाही केली. यांचे विचार ईश्वराधिष्ठित असून ते अत्यंत साधे व शुद्ध असत, यांचे चरित्र व उपदेश इतके अलौकिक व चमत्कारपूर्ण आहेत की जगातील विद्वानांवर

त्यांचा परिणाम झाला, यांचे प्रमुख प्रसिद्ध शिष्य विवेकानंद होते. वयाच्या

—_

१ : मराठी विश्वकोश : १३, पृ. ११८५-११८६.