व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 652

६१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

१४ व्या वर्षापासूनच यांची समाधी लागे. वारंवार देहभान विसरुन ते ब्रह्मस्वरूपात लीन होल. यांचे प्रतिपादन तर्कशुद्ध, स्पष्ट आणि थोडक्यात असे, काही प्रसंगी यांव्या बोलण्यात गूढता येई. अंत्यजापेक्षा आपण वरचढ आहोत ही भावना नष्ट करण्यासाठी त्यांनी अंत्यजाच्या घरचा केर आपल्या जटांनी काढला.

रामतिर्थ, स्वामी (१८७३-१९०६) :--प्रसिद्ध साधुपुरुष, तत्त्वज्ञानी व कवी,

पंजाबातील मुरलीवाला या गावी जन्म, मूळ नाव तीर्थराम, संन्यास घेतल्यावर रामतीर्थ हे नाव धारण केले. सांपत्तिक स्थितीला तोंड देऊन ते गणितात एम. ए. झाले (१८९५). काही काळ लाहोरच्या मिशन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक. स्वामी विवेकानंदांची वेदान्तावरील व्याख्यानांचा परिणाम होऊन

सर्वसंगपरित्याग, टोकियो येथे यांची भाषणे अत्यंत लोकप्रिय झालीत. ते अमेरिकेला पण गेलेत. तेथे प्रचंड स्वागत. संताचा पिंड परंतु वृत्ती देशभक्तीची. गंगेत स्नान करीत असताना पायाखालचा दगड निसटून बुडून मरण पावले.

राय, राजा राममोहन (१७७४-१८३३). :-एक प्रमुख बंगाली देशभक्त, धर्मसुधारक व ब्राह्मसमाजाचा आद्य संस्थापक. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे जन्म. बंगाली, फारसी, अरबी व संस्कृतचे शिक्षण. वेदान्त व उपनिषदाच्या अध्ययनातून एकेश्वरी मत. ' तुहफत्तुल मुवहिद्दीन ' हा फारसी ग्रंथ लिहून मूर्तिपूजेवर कडक टीका. पुढे इंग्रजी भाषेचा अभ्यास. १८१४ साली दिवाणगिरीची नोकरी सोडून कलकत्त्यास आत्मीय सभेची स्थापना. भावजयीच्या सती जाण्याचे दारुण दृश्य पाहून सती जाण्याच्या क्रूर चालीचा विरोध व त्यांच्याच प्रयत्नाने सतीबंदीचा कायदा. १८३० साली मोगल बादशहाने राजा ही पदवी दिली होती. फ्रान्स येथील ब्रिस्टल शहरी मृत्यु. कार्नोव्हेल येथे त्यांची समाधी आहे.

राजेसाहेब पानगल तथा रामराय निगार (१८६६-१९२८) :-यांचा जन्म एका क्षत्रिय कुटुंबात झाला. १८९३ साली प्रथम रसायनशास्त्राचे पदवीधर नंतर वकिलीची परीक्षा उतीर्ण होऊन १८९९ साली तामीळ व संस्कृत विषयात एम. ए. वरिष्ठ विधी मंडळाचे सभासद व साम्राज्य युद्ध परिषदेचे हिंदुस्थानचे प्रतिनिधी. १९२१ मध्ये स्थानिक स्वराज्य खात्याचे दिवाण. डॉ. नायरनंतर १० वर्षे मद्रास इलाख्याच्या राजकारणाचे सूत्रधार. ब्रिटिश सरकारने त्यांना १९२३ मध्ये 'राजे' ही वंशपरंपरेची पदवी दिली होती. १५ डिसेंबर १९२८ रोजी ते दोपी तापाच्या विकाराने निधन पावले.

ara, निकोलस अनू प्रिययेव्ह्यिच :--(६ डिसेंबर १८७०-२४ जानेवारी

१९६५). अलिकडच्या काळातील प्रमुख रशियन तत्त्ववेते. जन्म रशियाच्या