व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 653

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ६११

व्हीटेप्स्क प्रांतातील क्रेस्लाव्हका ह्या खेड्यात. सेन्ट पीटरझबर्ग विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर जर्मनीत पदव्युत्तर शिक्षण, प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेते. व्हिल्हेल्म व्हिंडलबांट, व्हिल्हेल्म ge आणि जी. ई. म्यूलर हे त्यांचे शिक्षक होते. १९०७ मध्ये डॉक्टरेट संपादन केल्यावर त्यांनी सेन्ट पीटर्झबर्ग विद्यापीठात अध्यापक म्हणून १९२१ पर्यंत काम केले. १९२२ मध्ये सोव्हिएट सरकारने त्यांना देशातून बहिष्कृत केले. त्यानंतर त्यांनी प्राग येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. १९४६ मध्ये ते अमेरिकेला गेले व पुढील अनेक वर्षे ते न्यूयॉर्क येथील सेन्ट व्हलद्यीम्थिर रशियन ऑर्थडॉक्स सेमिनरीमध्ये प्राध्यापक होते. लॉस्की यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांची परभाषांत भाषांतरेही झाली आहेत,

लॉस्की ह्याच्या तत्त्वज्ञानावर लायप्निट्स आणि आरी बेर्गसॉ ह्यांचा विशेष प्रभाव आहे. वेर्गसाँच्या प्रभावामुळे त्यांनी प्रतिमान ह्या संकल्पनेला आपल्या ज्ञानमीमांसेत मध्यवर्ती स्थान दिले. लॉरकी यांच्या मताभमाणे ज्ञानाचा विषय असलेली जी वस्तू असते, ती वस्तूच त्या ज्ञानात आपल्याला साक्षात गोचर झालेली असते. तिचे प्रतिनिधित्व करणारी संवेदना, प्रतिमा इ. हा ज्ञानाचा विषय नसतो; ती वस्तूच ज्ञानाचा साक्षात विषय असते. अशा राक्षात ज्ञानाला प्रति मान म्हणतात लॉस्की ह्यांनी प्रतिमानाचे तीन प्रकार कल्पिले आहेत, अवकाश आणि काळ ह्यांच्यात स्थाने असणार्‍या ज्या वस्तू किंवा घटना असतात, त्यांची प्रतिमाने आपल्याला असतात. ही ऐंद्रिय प्रतिमाने. अशा बस्तू-घदनांना वास्तव सत्ता असते, असे लॉस्की म्हणतात. संख्या, वस्तू आणि तिचे गुण यांच्यामधील संबंध इ. ह्यांना अस्तित्व, म्हणजे सत्ता आहे; पण हे अस्तित्व स्थळकाळात्तील नसते, अशा अस्तित्वांची आपल्याला जी प्रतिमाने लाभतात, ती बौद्धिक प्रतिभाने असतात. शिवाय लॉस्की ह्यांच्या मताप्रमाणे स्थळकाळातील अस्त्िवापलीकडची अशी केवल सत्ता आहे. ही केवल सत्ता म्हणजे ईश्वर ईश्वराचेही आपल्याला प्रतिमान होऊ शकते. हे गुह्य प्रतिमान होय.

लॉस्की ह्यांची वस्तुमीमांसा लायणिट्स ह्यांच्या वळणाची आहे. लायप्निट्स ह्यांच्या एकक ह्या संकल्पनेच्या जागी ते द्रव्यात्मक कर्ता ही संकल्पना स्वीकारतात. लायप्तिट्स यांच्या म्हणण्याप्रमाणे हे संबंध वस्तुजात जसे अखेरीस एककांचे बनलेलं आहे, एकक असलेली द्रव्ये हे जसे त्याचे अंतिम घटक आहेत, त्याप्रमाणे लॉस्की ह्यांच्या मतानुसार द्रव्यात्मक कर्ते हे वस्तुजाताचे अंतिम घटक .आहेत. प्रत्येक द्रव्यात्मक, कर्त्याला निवड करण्याचे स्वातंब्य असते. एखादां परमाणू हा सर्वात कनिष्ठ प्रकारचा द्रव्यास्मक कर्चा आहे. निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे कनिष्ठ पायरीवरील द्रव्यात्मक कर्ता वरच्या आणि मग त्याच्या वरच्या अशा पायऱ्यांवरील स्वरूप प्राप्त करून घेण्याच! प्रयत्न करतो, असा प्रयत्न करण्याचे सामर्थ्य अंगी असल्यामुळे तो कर्ली