£42 डॉ. दावाराहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे
असतो, अशा रीतीने कनिष्ठ स्तरावरील ट्रव्यात्मक कर्ते उच्चतर प्रकारांत उत्क्रांत होत जातात. जेव्हा एखाद्या द्रव्यात्मक कर्त्याला अंतिम नैतिक मूल्यांची प्रतिमाने प्राप्त होतात आणि त्यांना अनुसरून तो आपली निवड वा निर्णय करतो, तेव्हा तो एक व्यक्ती किंवा पुरुष (पर्सन) ह्या पदाला पोहोचतो.
ईश्वर हा सर्व द्रव्यात्मक कर्त्यांचा निर्माता आहे. ह्या द्रव्यात्मक कर्त्यांचे एकमेकांशी जे कलह-सहकार्यांचे संबंध असतात आणि त्यांचा एकमेकांवर जो प्रभाव पडतो, त्यांतून विश्वाचा व्यवहार निष्पन्न होतो. विश्वातील सर्व वस्तू एकाच अवकाशात आणि काळात आहेत म्हणून विश्व एक आहे असे नाही, तर ईश्वराने सर्व वस्तू म्हणजे द्रव्यात्मक कर्ते निर्माण केले आहेत म्हणून विश्व एक आहे. ज्याला आपण अवकाश आणि काल म्हणतो, ती द्रव्यात्मक कर्त्यामधील संबंधाची रुपे आहेत. माणसांचे अंतिम भवितव्य हे ईश्वराचे म्हणजे केवल सत्तेचे साक्षात दर्शन किवा गुह्य प्रतिमान प्राप्त करून घेणे हे आहे. ईश्वराच्या अशा प्रतिमानातून माणसाला निरपेक्ष अथवा केवल नीतीचे तत्त्व लाभते, सर्व निर्णय ह्या तत्त्वाला अनुसरून करण्याने माणूस आपले आदर्श स्वरूप प्रत्यक्षात सिद्ध करतो.
लिन्लिथगो, लार्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप (२४ सप्टेंबर १८८७ - ५ जानेवारी १९५२). :-दुसन्या महायुद्ध काळातील ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९३६-४३). त्याचा जन्म खानदानी घराण्यात अंवरकॉर्न (पश्चिम लोथिअन-स्कॉटलंड) येथे झाला. ईटन (केंब्रिज विद्यापीठ) येथे त्याने उच्च शिक्षण घेतले, त्याला १९०८ मध्ये वडिलाजिंत उमरावपद प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) त्याने पश्चिम आघाडीवरील सैन्य दलात विशेष कामगिरी केली. त्यानंतर त्याची आरमारात मुलकी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. इंग्लंडमध्ये मजूरपक्ष सत्तेवर येताच हुजूरपक्षाच्या उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली (१९२४). शाही कृषी आयोगाचा तो अध्यक्ष म्हणून हिंदुस्थानात आला (१९२६-२८). येथील अनेक प्रश्नांची माहिती त्याने करून घेतली. हिंदुस्थानात घटनात्मक बदल करण्यासाठी नियुक्त केलेल्या निवड समित्तीचाही तो अध्यक्ष होता. पुढे त्याची व्हाईसरॉय म्हणून हिंदुस्थानात नेमणूक झाली (१९३६).
त्याने प्रारंभी १९३५ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रांतिक स्वायत्ततेच्या तत्त्वानुसार काँग्रेसने निवडणुकीत भाग घेतला आणि सात प्रांतांत स्वतंत्र मंत्रिमंडळे बहुमताच्या तत्त्वावर स्थापन केली (१९३७). ee RT sng aren A
` : मराठी विश्वकोश : १५, पृ. ४६६.