व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 655

व्यक्ती, संस्था, कार्य--सूची ६१३

त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेत प्रांतिक गव्हर्नरांनी विशेष अधिकार वापरून ढवळाढवळ करू नये, अशी काँग्रेसची अपेक्षा होती; परंतु मुस्लिम लीग आणि एकूण सरकारी धोरण यामुळे मंत्रिमंडळांना हवी ती स्वायत्तता लाभली नाही. त्यातच १९३९ साली दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. काँग्रेस व एतद्देशियांचा सल्ला न घेता हिंदुस्थानने महायुद्धात भाग घेतल्याचे लिन्‌लिथगोने जाहीर केले. वसाहतीचे स्वराज्य व इतर किरकोळ आश्वासने देऊन महायुद्धात मारतीयांनी सक्रिय साह्य करावे, असे लिन्‌लिथगोने सुचविले. सरकारला साह्य नाकारण्यासाठी आणि व्हाइसरॉयच्या घोषणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी डिसेंबर १९३९ मध्ये कॉग्रेसच्या मेत्रिमंडळांनी राजीनामे सादर केले

वसाहतीचे स्वराज्य, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व संस्थानिक मिळून युद्ध सल्लागार मंडळ नेमण्याचे आणि युद्ध समाप्तीनंतर हिंदुस्थानची आगामी घटना -तयार करण्यासाठी सर्वपक्षीय घटना' समिती बोलाविण्यात येईल, असे लिन्‌लिथगोने ऑगस्ट १९४० मध्ये घोषित केले. घोषणेतील आश्वासने सरकारने पाळली नाहीत म्हणून काँग्रेसने म, गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू केला. त्यावेळी मुस्लिम लीगने हिंदुस्थानच्या फाळणीचा पुरस्कार केला.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती १९४१ मध्ये बदलली. जपानने जर्मनीची बाजू घेऊन युद्धात उडी घेतली आणि इंडोनिशियात वर्चस्व स्थापून सिंगापूर, रंगून आदी प्रदेश व्यापले. सागरीमार्गे जपान भारतावर आक्रमण करील, अथी चिन्हे दिसू लागली. लिन्‌लिथगोने सुद्ध साहित्य व वीस लाखांची फौज तयार केली. हिंदुस्थानातील राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळावा म्हणून स्टॅफर्ड क्रिप्सच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात आले. युद्धोत्तर काळात भारतीय संघराज्यास वसाहतीचे स्वराज्य देणारी घटना मांडण्यात येऊन लोकप्रतिनिधींची घटना समिती बोलाविण्यात येईल, असे क्रिप्सने जाहीर केले. क्रिप्स योजना अयशस्वी झाल्यानंतर म. गांधीनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी छोडो भारत आंदोलन सुरू केले. परिणामतः म. गांधीसह मान्यवर नेत्यांना अटक झाली. या वेळी सुभाषचंद्र बोस यांनी नजरकेदेतून पलायन करून जपान मध्ये आझाद हिंद सेनेची उभारणी क्रेली. लिनूलिथगोचे देशातील चळवळ दडपण्याचे प्रयत्न निरर्थक ठरले व त्याला इंग्लंडला परत जावे लागले, पुढे स्कॉटलंडमध्ये एडिंबरो विद्यापीठाच्या कुलपतिपदी त्याची नियुक्ती झाली (१९४४-५२). त्या पदावर असतानाच तो अँवरकॉर्न येथे मरण पावला.

स्वामी विवेकानंद (१८६२-१९०२) :-मूळ नाव नरेन्द्र दत्त. कायस्थ घराण्यात