व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 656

६१४ डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

जन्म, कॉलेजात असतानाच पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास बी. ए. झाल्यावर ब्राहा समाजात प्रवेश. पुढे रामकृष्ण परमहंसाचे शिष्यत्व. विविध धर्माचा तौलनिक अभ्यास व आध्यात्मिक चिंतन. १८९३ सालच्या शिकागोच्या जागतिक धर्मपरिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व, आपल्या असाधारण वक्तृत्वाने ही परिषद गाजविल्यावर जागतिक कीर्ती. ४ जुले १९०२ रोजी समाधिस्थ. धर्मापेक्षा मानव श्रेष्ठ व म्हणून मानवसेवा हाच खरा धर्म ही लोकांना प्रमुख शिकवण, त्यासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना,

विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५-१८७१) :-ख्रिस्ती मिशनऱ्यांना प्रारंभी तोंड देणारे हिंदू मिशनरी व स्वतंत्र विचाराचे गृहस्थ, यांचे पूर्ण नाव विष्णु भिकाजी गोखले, गाव शिरवली. हे वडिलांचे दहावे अपत्य, वडिल पाचव्या वर्षी वारले. थोडे घरगुती शिक्षण झाल्यानंतर गुरे चारणे, दुकान, जळातनाके वगैरे ठिकाणी नोकरी केल्यावर २० व्या वर्षी उपरती होऊन यांनी सप्तश्रृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या केली. पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनःस्थापना करण्याचा आदेश यांना मिळाला (वेदोक्त धर्मप्रकाश पा. ७३८). हा ईश्वरी प्रसाद झाल्यावर पंढरपुरी विठ्ठलाच्या मांडवात यांनी भावार्थरामायणाची तीन पारायणे केली. भावार्थसिधु हा ओवीबद्ध ग्रंथ प्रसिद्ध केला (१८५६) व महाराष्ट्रभर व्याख्याने देऊन हे मुंबईस आले. तेथे खिश्चन मिशनच्यांच्या आक्षेपाला उत्तर देण्याकरिता दर शनिवारी प्रभु लोकांच्या विद्यालयात व्याख्याने देण्यास सुरूवात केली व इतर ठिकाणी वादविवाद केले, तेथे एक आणा दर ठेवूनहि पोलिस बंदोबस्त ठेवण्याइतपत गर्दी होई. बंदिस्त जागेत अस्पृश्य व ख्रिस्ती यांना येण्यास हरकत होती, हे पाहून त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर व्याख्याने देण्यास सुरूवात केली. ५७ च्या बंडात यांना व्याख्याने देण्यास बंदी झाली. तेव्हा यानी 'वेदोक्तधर्मप्रकाश' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. हे गौरवर्णीय, धडधाकट व प्रसत्र मुद्रेचे गृहस्थ मोठे लहरी होते.

“महार दरवाज्याबाहेर आणि ब्राह्मण आत असा पक्षपात करू नये” अशा

विचाराचे ते होते.

शारदा बिल :--बालविवाहासंबंधीचे होते. ते रायसाहेब हरविलास शारद (सारडा) यांनी खाजगी सभासद म्हणून मांडले होते. मुलीच्या वयाची मर्यादा १४ वर्षे ठेवली होती. १४ वर्षापेक्षा लहान मुलीचे लग्न केल्यास आई-वडिलांना

— पणा

मराठी ~ FARTEN : १५, पु ५८६-५०5.