व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 657

व्यक्ती, संस्था, कार्य--सूची ६१५

१ महिन्याची शिक्षा व १००० रु. दंड सुचविला होता. सनातन्यांचा ह्या बिलाला विरोध होता. वय कमी मान्य करावे असा सनातन्यांचा आग्रह होता.

शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी (१८७३-१९४४) :-समतोल विचारवंत, सर्व धर्माचे व्यासंगी अभ्यासक व कर्ते सुधारक, जमखंडी येथे मराठा जातीत जन्म, फस्ट बी.ए..एल,एल.बी.ची परीक्षा झाल्यावर प्रार्थना समाजाकडे ओढा. याच समाजातर्फे तौलनिक धर्मशास्त्रांचा अभ्यास करण्याकरिता ऑक्सफोर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात अध्ययन, अस्पृश्यांच्या उन्नतीच्या चळवळीसाठी १९०६ मध्ये 'डिप्रेस्ड क्लास मिशन' ची (भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळाची) मुंबई येथे स्थापना. महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाज राजकारणाल मागासलेला राहू नये म्हणून १९१७ साली 'राष्ट्रीय मराठा पक्षा' ची स्थापना व लो. टिळकांच्या बरोबर राजकीय क्षेत्रात सहकार्य, पुढे म. गांधींबरोबर राष्ट्रीय आंदोलनात भाग घेऊन १९३० साली ६ महिने सश्रम कारावास. विविध विषयांवर संशोधनपर, चिंतनपर लेखन. 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्रात्मक, पुस्तक, “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्‍न' हे संशोधनात्मक पुस्तक

प्रसिद्ध.

सत्यमूर्ती (१८८७-१९४३) :-दक्षिणेतील एक राजकारणी व समाजकारणी कार्यकर्ते, वक्ते. शिक्षण पदुकोट्टा येथील साजपुत्रांचे कॉलेज व मद्रास येथे. ३० वर्षे काँग्रेसच्या राजकारणात सक्रीय भाग. मद्रास जिल्हा व तामीलनाड प्रांतिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष.

समाज-समता-संघ :-सामाजिक समतेच्या चळवळीची प्रगती व्हावी, यासाठी प्रत्यक्ष लोकजागृती व्हावी या हेतूने आपल्या हातून कार्य व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी ४ सप्टेंबर १९२७ रोजी समाज-समता-संघा ची स्थापना केली. या संघाची तत्त्वें व उद्देश खालीलप्रमाणे होती--

(१) सर्व मनुष्यप्राणी समानाधिकारी असून स्वत्तःतील मनुष्यत्वाच्या विकासासाठी कारणीभूत होणाऱया प्रत्येक साधनावर, सवलतीवर व संधीवर त्यांचा प्रत्येकाचा समसमान व सारखा हक्क असतो, असा या संघाचा विश्वास आहे.

(२) समानतेचा हक्क हा पवित्र, अबाधित व अभेद्य आहे.

(३) हा हक्क वर्ण, पंथ, जात व स्त्रीपुरुष भेदातीत आहे.

(४) सामाजिक समता अस्तित्वात आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत चालणे अशक्य आहे.