६१६ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
(५) समाजाच्या सुरळीत व सुसंघटित आयुष्य क्रमाला बाधक होणारे सर्व विचार, आचार (कार्य) व संस्था ही सारी समाज समता तत्त्वाच्याविरुद्ध आहेत, अशी या संघाची निषेधपूर्वक घोषणा आहे.
(६) शक्य त्या उपायांनी वरील तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचा ह्या संघाचा संकल्प आहे.
सावरकर, डॉ. नारायण दामोदर (१८८९-१९४९) :-स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधु, हिंदूसभेचे निष्ठावंत कार्यकर्ते. लॉर्ड मिंटोवरील बॉँम्बफेक प्रकरणात व जॅक्सन खून प्रकरणात अटक, १९१२ साली कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश. कॉलेज फी भरण्यासाठी कादंबऱ्या लिहिल्या. १९१६ मध्ये एल.सी पी.एस. व एल.अम.एस, (होमिओ) या परीक्षा उतीर्ण. दतवैद्यकी सुरू. १९२०-२१ मध्ये होम रूल चळवळीत प्रत्यक्ष सहभाग, स्वामी श्रद्धांनद यांच्या मृत्यूनंतर सुरू केलेल्या ' श्रद्धानंद ' या पत्राचे सात वर्षे संपादक.
सुर्वे, अड. आनंदराव :-भंडारी जातीतील पहिलेच बी.ए., एल.एल.बी. विद्यार्थी दशेपासूनच सार्वजनिक कार्याची आवड. त्यांनी एक नाईट हायस्कूल काढले
होते.
©