नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 66

२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ते सदोदीत एकमेकाकडे वक्र दृष्टीनें पहात राहतील व एकमेकांचे उड़े काढण्यास सिद्ध होतील, अशी व्यवस्था करणें या सारखी दुसरी मूर्खपणाची कोणती योजना असू शकेल ? आपल्या प्रांतातील हिंदुलोक हे आपणास जामीन दिलेले लोक आहेत असें मुसलमानांनी मानावयाचे व आपल्या प्रांतातील मुसलमान लोक हे आपणास जामीन दिलेले लोक आहेत असे हिंदूंनी मानावयाचे असा जर उभयपक्षांनी कृतनिश्चय केला तर एकाही प्रातातील लोकांस सुख व स्वास्थ लाभेल असे आम्हास मुळींच वाटत नाहीं. एका प्रांतातील बहुसंख्यांक लोक तेथील अल्पसंख्यांक लोकांचा छळ करण्याचा मूर्खपणा करतील म्हणून इतर प्रांतातील बहुसंख्यांक लोकांना तेथील अल्पसंख्यांक लोकांचा विनाकारण छळ करण्याची सवड देण्यांत यादी हा न्याय अगदी रानटी आहे. आतां नेहरू कमिटीवाले लोक असें म्हणतील कीं, आम्ही जी प्रांतरचनेची योजना केळी आहे ती एक भाषा एक प्रांत अशा भावनेने केली आहे, त्याचा परिणाम कांही vim 7 हिंदूंच प्राबल्य व कांही प्रांतांत मुसलमानांचे प्राबल्य असा होत असेल तर त्याला न इलाज आहे ! याला आमचे उत्तर असें आहे कीं, कोणतीही व्यवस्था बरी निपजेल Maa वाईट निपजेल हें सर्वस्वी तिच्या मुळाशी असलेल्या हेतुवर अवलंबून राहील. व्यवस्था दिसावयाला चागली असली पण तिच्या मुळाशी असलेला हेतु जर वाईट असेल तर तिचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाहींत. “ जैंसी वासना तैसे फळ “ ही संतोक्ति प्रसिद्धच आहे. एक भाषा बोलणारे लोक एकत्र यावेत, त्याचे मीलन होऊन ते संघटीत व्हावेत, त्यांची संस्कृती वाढावी व राष्ट्राच्या ऐश्वर्यात व लौकिकांत भर पडावी हा जर भाषावार प्रांतरचनेचा हेतु असतां तर ती आम्ही खपवून घेतली असती पण भाषावार प्रांतरचनेचा हा हेतु नाही है मुसलमान लोकांनी अगदीं स्पष्ट करून सांगितले आहें. आमची दाढी कांही प्रांतात हिंदूंच्या हातांत आहे तशी कांहीं प्रांतात तरी हिंदूंची शेंडी आमच्या हातात पाहिजे म्हणून अशा तऱ्हेची प्रांतरचना आपणांस अवश्य आहे असें त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. हिंदु समाजांत साटालोटीच्या लग्नाची पद्धत आहे. त्यांत 'अ' ची बहीण 'ब' ला आणि 'ब' ची बहीण 'अ' ला देऊन सोयरसंबंध करण्यांत येतो. हेतु हा की 'अ' नें जर 'ब' च्या बहिणीला जांच केला तर 'ब' ने 'अ' च्या बहिणीला जांच करून एकमेकांनी एकमेकांस ताळ्यावर आणीत राहावे. नेहरु कमिटीची प्रांतरचना म्हणजे हिंदु-मुसलमानामधील एक प्रकारचे साटालोटीचे लग्न आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. ज्या हेतुने साटालोटीचे लग्न करण्यांत येतें त्याच हेतूनें ही प्रांतरचना करण्यात येत आहे. साटालोटीचे लग्न हैं इतर प्रकारच्या लग्नासारखेंच असतें. पण त्याचा वाईट हेतु कृतींत अवतीर्ण झाल्या शिवाय राहत नाहीं. याचा अनुभव सर्व हिंदुंना आहेच. त्याच प्रमाणें या प्रांतरचनेचा