नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 70

२८ डॉ. बग्बासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व्यवहारीकदृष्ट्या विचार करणाऱ्या कोणाहि माणसास वाटल्याशिवाय राहणार नाही. साग्राज्यांतर्गत स्वराज्य हें जसें कॅनडा, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया वगैरे साम्राज्यांत सामील असलेल्या राष्ट्रांना झालेले आहे तसें हिंदुस्थानाला कांही प्राप्त झालेलें नाहीं हें खरें, पण तें प्राप्त होण्यासारखे नाहीं असें मात्र नाहीं. प्रश्न इतकाच आहे कीं या साम्राज्यांतर्गत स्वराज्यावर हिंदुस्थान देशाने संतुष्ट राहावे किंवा नाहीं? लाला लजपतराय , दासबाबु हे साम्राज्यांतर्गत स्वराज्य याच ध्येयाचे पुरस्कर्ते होते. हे दोघे कांही कमी प्रतीचे राष्ट्रभक्त होते किंवा त्यांचा देशाभिमान कमी प्रतीचा होता असा आरोप कोणासहि करतां यावयाचा नाहीं. त्यांनी जें ध्येय निश्चित केले ते विचार केल्याशिवाय केलेलें नाहीं. व व्यावहारिकदृष्ट्या हेंच ध्येय डोळ्यापुढे ठेवणें कल्याणकारक आहे असें आम्हास वाटतें. तत्त्वाशी खाणाऱ्या लोकांना हें ध्येय कमी प्रतीचे वाटेल. पण तात्विक दृष्ट्या विचार करणाऱ्या लोकांना आमचा असा प्रश्‍न आहे कीं असें कोणते स्वतंत्र राष्ट्र आहे कीं ज्याचे स्वातंत्र्य मर्यादीत झालेलें नाही ? स्वतंत्र असलेली राष्ट्रे देखील इतर राष्ट्रांपासून कांही विशेष प्रकारचा अर्थ साधावयाचा असल्यास इतर VAT अटी मान्य करून आपलें स्वातंत्र्य मर्यादित करून घेतात. आणि ते घ्यावेंहि लागते. कारण VHT WS दुसऱ्या राष्ट्रांशी देवाण-घेवाण केल्याशिवाय कोणाचेहि चालणार नाही. एकंदरीत सर्वच राष्ट्रे तात्विक दृष्ट्या स्वतंत्र असली तरी व्यवहारांत त्यांना परतंत्र होऊनच रहावें लागतें. नुसत्या शब्दच्छलासाठी स्वातंत्र्याचा पुरस्कार करावयाचा असल्यास त्याला कोणीही हरकत करण्याचा शीण घेईल असें आम्हांस वाटत नाहीं, परंतु, सर्वानी ध्यानांत घेण्याजोगी गोष्ट ही की तात्विक दृष्ट्या राष्ट्रांनी स्वातंत्र्याची शेखी कितीहि मिरविली तरी व्यवहारांत त्यांना थोडें बहुत पारतंत्र्य पत्करावेंच लागते.असे जर आहे तर ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य लाभल्यास या देशाला तें कां उणें पड़ावें याचें आम्हांस आश्चर्य वाटते. पण समजा कीं स्वातंत्र्य मिळालें तें राखता येईल किवा नाहीं याचाहि विचार झाला पाहिजे. तें जर राखतां आलें नाही तर साम्राज्यातील स्वराज्य घालवून पारतंत्र्य ओढून घेतल्यासारखे होईल. व तसें जर झालें तर हातचा हिरा जाऊन पदरी गार येईल. आम्हीं जो या विषयासंबंधी विचार केला आहे, त्यावरून काँग्रेसवाल्या लोकांनी जो हा स्वातंत्र्याचा उपद्व्याप आरंभिला आहे. त्यामुळे या देशाला पुन्हा पारतंत्र्याची दशा भोगावी लागणार आहे अशी आम्हांस धास्ती वाटते. जो कोणी आशीया खंडाच्या नकाशाकडे पाहील त्याला कळून येईल की हा देश कसा बेचकडींत सांपडला आहे. एका बाजुनें चीन व जपान या भिन्न संस्कृतीच्या राष्ट्रांचे वेष्टण पडलें आहे. दुसऱ्या बाजूनें टर्की परशिया व अफगाणीस्तान या तीन मुसलमान राष्ट्रांचे वेष्टण पडलें आहे. या