नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 72

30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कां त्यांनी शत्रुला सहाय्य केले, नव्हें तटस्थ राहिले तर अर्धे मकान गाठींपर्यंत त्याला कोणीच शह देऊं शकत नाहीं. घरच्यांच्याच सहाय्यानें आंत आलेला शत्रु घर करून रहाणार. त्याला बाहेर घालविणें अशक्य आहे. याची जाणीव सर्व हिंदुंनी ठेवणें अवश्य आहे. मुसलमानी वारें कोणत्या दिशेनें वाहत आहे याबद्दल कांही संशय उरलेला नाही. एकदां राजनिष्ठ प्रजेमध्ये मुसलमानांची गणना मोठ्यां प्रामुख्यानें होत होती. ब्रिटीश साम्राज्याचे कट्टे उपासक म्हणून मुसलमान लोकांनी अराजक अशा कांग्रेस पक्षाशी होता होइल तो स्नेहसंबंध जोडण्याचे टाळले. ते मुसलमान लोक आज स्वातंत्र्यवादी बनले आहेत. |! पण ही त्यांची स्वातंत्र्याची आवड रा्ट्रप्रेमामुळे उत्पन्न झालेली नसून ब्रिटीश साम्राज्याच्या चौकटींत Gar बसलेल्या या देशाला मुसलमानी साम्राज्याच्या चौकटींत जखडून ठेवण्यासाठीं उघड्यावर आणण्याचा हा मुसलमानी कावा आहे, असें मुसलमानांचेच पुढारी सर अली इमाम सांगत आहेत. आमचे महात्मा गांधी मात्र हें मुसलमानामधील मतांतर राष्ट्रप्रेमाचें चिन्ह आहे असें मानून त्याच्या आधारावर १९३१ सालापासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू करणार आहेत. ईश्वर करो आणि म. गांधी पासून या देशाची सुटका होवो |

आमच्या देशबांधवांस आमची अशी विनंती आहे कीं नेहरू कमिटीच्या योजनेची आम्ही जी छाननी केलीं आहे तिचा त्यांनी पूर्ण विचार करावा. ती छाननी आम्ही

THAT होऊन केलेली नाही. नेहरू कमिटीच्या योजनेला जो आम्ही विरोध

केला आहे तो कमिटीने अस्पृश्यांची पायमल्ली केली आहे म्हणून नव्हे. तिच्यांत हिंदुंना धोका तसेंच हिंदुस्थानवर अरिष्ट आहे म्हणून आम्ही विरोध केला आहे. या योजनेत कांही धोका नाही असें वाटून कांहीं लोक तिला पाठिंबा देत असतील. कांहीं धोका आहे असें जाणून पाठिबा देत असतील. या दोन्ही वर्गांबद्दल आम्हांस कांहीं कर्तव्य नाहीं. पण या दोन वर्गाशिवाय दुसरा असा मोठा वर्ग आहे की जो यांत कांहीं धोका आहे हैं न जाणल्यामुळे या योजनेला पाठिंबा देत आहे. त्या वर्गाला योग्य ती बूज व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न सिद्धिस जाण्यासाठी आत्यंतिक स्पष्टोक्ती करणें आम्हांस प्राप्त झाले आहे. या अग्रलेखांतील स्पष्टोक्ती पाहून कांही लोक आम्हांस दुषण देतील. व्यवहारांत कांही प्रसंगी सत्य लपवून ठेवणे फायदेशीर असते. उलट पक्षी कांहीं प्ररांगी सत्य उघडकीस न आणणें या सारखे मोठे पातक नसते. आजचा हा प्र पंग दुसऱ्या प्रकारचा असल्या कारणानें इतकी स्पष्टोक्ती करणे आम्हास भाग पडलें आहे. शिवाय जेथे भीक आलेली पुरवली पण भीड मोडू नये अशी वृत्ती