नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 73

नेहरू कमिटीची योजना वं हिंदुस्थानचे भवितव्य 39

सर्वत्र धारण करण्यांत आली आहे तेथें कोणीतरी निर्भीडता स्वीकारून खरें असेल ते जनतेपुढे मांडले पाहिजे. हिंदुसमाजाचा रोष आमच्यावरती आहेच. त्यांत मुसलमान समाजाच्या रोषाची भर पडणे बरे नव्हे हे आम्हांला कळत आहे. पण ज्यांत आमच्या देशाचे अकल्याण आहे त्यांत आमचेहि अकल्याण आहे अशी आमची भावना असल्यामुळें हें जोखीम आम्हीं आमच्या शिरावर घेतलें आहे. त्याचें चीज होऊन लोक मतास योग्य वळण लागेल अशी आम्हांस आशा आहे.

oS

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १८ जानेवारी १९२९.