८
समतेसाठीच ही विषमता
डॉ. आंबेडकरांनी सायमन कमिशनपुढें दिलेल्या साक्षीतील निरनिराळ्या मुद्यांवर निरनिराळे आक्षेप आजवर घेण्यांत आले. यांपैकी बरेच आक्षेप स्पृश्यांनीं घेतले होते तर फार थोडे अस्पृश्यांनी घेतले होते. यांपैकी बहुतेक आक्षेपांचें खंडण आम्ही यापूर्वी केलेलें आहे व अस्पृश्यसमाजाच्या परिस्थितीचा सर्व बाजूंनीं विचार करतां ती साक्ष कशी यथायोग्य होती हें दाखवून दिलें आहे. आम्हांला आनंद वाटतो कीं तें आमचें विवेचन बहुतेकांना पटलें आहे. विशेषतः अस्पृश्य समाजाकडून डॉ. आंबेडकरांच्या साक्षीला मनःपूर्वक पाठिंबा मिळाला आहे व मिळत आहे. कांही अस्पृश्यांची मनें अद्याप संशयात लोंबकळत नसतील असें नाहीं. पण तीं लवकरच ठिकाणावर येतील यांत आम्हांला मुळींच शंका वाटत नाहीं. आतां आमचे स्पृश्य आक्षेपक जे आहेत त्यांचीं तोंडें मात्र अद्याप बंद पडलेली नाहींत, व पुढेंही बराच काळपर्यंत पडण्याचा संभव नाहीं. त्यांच्या आक्षेपांचे खंडण म्हणजे व्यर्थ कालाचा व्यय हें आम्हांला समजतें. . तरी पण त्यांच्यामुळे होणारी अस्पृश्यसमाजाची दिशाभूल टाळण्यासाठी त्यांच्या खंडणार्थ आम्हांला हातीं लेखणी घ्यावी लागते. एवंच आमचा हा प्रयत्न स्पृश्यांच्या समाधानासाठी नसून, त्यांच्या आक्षेपामुळें अस्पृश्यसमाजाची होणारी दिशाभूल टाळण्यासाठी आहे.
या आक्षेपांपैकीं एक नवा आक्षेप पुढीलप्रमाणें आहे. असे विचारण्यात येत आहे कीं डॉ. आंबेडकर हे समाजसमतासंघाचे अध्वर्यु व अध्यक्ष असतां त्यांनीं अस्पृश्यसमाजासाठीं जातवार प्रतिनिधित्वाची मागणी कशी केली ? एकाद्या समाजासाठी जातवार प्रतिनिधी मागणे ही विषमता नव्हे काय ? हा आक्षेप प्रथमत: पुण्याच्या चित्रमयजगत्च्या संपादकाकडून घेण्यांत आला, व पाठीमागून त्याचे प्रतिध्वनी पुष्कळ लुंग्यासुंग्या पत्रांतून उमटले. अजूनही ते उमटत आहेत हैं वृत्तपत्राच्या वाचकांना माहीत आहेच. प्रस्तुत आक्षेप अगदीं बिनतोड, मोठ्या वकिली tara व प्रतिपक्षाचें तोंड एकदम बंद करणारा असा आहे असा आक्षेपकांचा समज असावा. पण हा त्यांचा भ्रम आहे हें विचार केल्यास ध्यानांत येइल. या आक्षेपकांना