समतेसाठीच ही विषमता - Page 75

३३ समतेसाठीच ही विषमता

समतावाद्यांचे ध्येय

ते त्यांनीं जांणून घेतलें असतें तर काय आहे हेंच मुळी कळलेले नाहीं. जर

नसता. त्यांना असे वाटत असावें असला आक्षेप घेण्याचा मुर्खपणा त्यांनी केलाच

कीं सर्वांना समतेनें वागविणें हें समतावाद्यांचे ध्येय आहे. पण हीच त्यांची चूक आहे हें त्यांना कळविण्याची आम्ही परवानगी घेतो. समतावाद्यांचे ध्येय सर्वांना

समतेनें वागविणें हें नसून

समता प्रस्तापित करणें

हें आहे. हें ध्येय साधतांना सर्वांना समतेनें वागवून. चालणे शक्‍य नाहीं. जेथें सर्व व्यक्ती. समान आहेत तेथें कांहीं व्यक्‍तींना असमानतेनें बागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथें व्यक्ती असमान.आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणें म्हणजे समताप्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणें होय. या बाबतीत रोगी माणसाचें उदाहरण बरोबर' लागू पडतें. सुदृढ माणसाला जाडेंभरडें अन्न चालतें. पण सुदृढ माणूस व रोगी. माणूस हे दोघेही सारखे मानून जर एखादा वेडगळ 'समतावादी' तें 'जाडेंभरडें अन्न रोग्याला देईल तर रोग्याचा प्राणदाता होण्याऐवजी प्राणहर्ता होईल. त्याचप्रमाणे श्रीमंतांठर जितका कर असतो, तितकाचं गरीबांवर ठेवावा, कारण तर्से न केल्यास असमानता होईल असें जर कोणी म्हणेल तर लोक त्याला वेड्यांत काढतील. सारखा कर देण्याची ऐपत असलेल्या श्रीमंतांपैकी कांहींवर कमी व कांहीवर जास्त असा जर कर लादला किंवा सुदृढ माणसाला पचण्याजोगे अन्न पचविण्याची ज्यांच्यांत

ताकद आहे त्यांना रोग्याचे अन्न दिलें तर मात्र विषमता होईल. या

उदाहरणावरून तात्पर्य घ्यावयाचें तें हैं कीं,

समानांना असमानतेनें व असमानांना समानतेने न वागविणे हा

समतावाद्यांचा दस्तुर आहे.

या दस्तुरान्वयें पाहिलें असता डॉ. आंबेडकरांची मागणी त्यांच्या समतावादाला

पूर्णपणें धरुन आहे हें कळून येणें सोपें आहे. स्पृश्य व अस्पृश्य हें दोन्ही वर्ग

सारख्या भूमिकेवर असते व मग अस्पृश्याना,जातवार प्रतिनिधि पाहिजेत अशी

डॉ. आंबेडकरांनी मागणी केली असती, तर त्यांच्या समतावादावर आक्षेप घेणे

योग्य-ठरले असतें. एकाच दर्जाच्या लोकांत डॉ. आंबेडकर भेदभाव माजवूं

इच्छितात असें मग म्हणतां आलें असतें. पण स्पृश्य व अस्तृश्य या दोन वर्गात

कोणत्याही प्रकारची समानता नाहीं हें उघड दिसत आहे. शिक्षण, सपत्ती व

लोकसंख्या ह्या तिन्ही बाबतींत या दोन्ही वर्गात जमीन अस्मानाचें अंतर आहे.