समतेसाठीच ही विषमता - Page 76

३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

शिक्षणाच्या बाबतीत स्पृश्य पुढारलेले व अस्पृश्य मागासलेले, संपत्तीच्या बाबतींत स्पृश्य श्रीमंत व अस्पृश्य गरीब व लोकसंख्येच्या बाबतींत स्पृश्य बलवान व अस्पृश्य दुर्बल असा प्रकार आहे. म्हणजे अस्पृश्यसमाजाचें पारडे स्पृश्य- समाजाच्या पारख्यापेक्षां सर्वच दृष्टींनो हलके आहे. अशा असमान वर्गांना समानतेनें वागवायचें ठरलें तर त्यांच्या परस्पर वागणुकींत कोणताही बदल होण्याची आशा करावयास नको, हें उघड आहे.

समता म्हणजे समानतेची वागवणुक असा जे अर्थ करतात त्यांच्या विचारसरणींत केवढा अनर्थ भरलेला आहे हे वरील विवेचनावरून ध्यानांत येईल. डॉ. आंबेडकरांची उक्ती व क॒ती यांच्यात विसंगतता दाखविण्याच्या हेतूनें ज्या लोकांनी ही दिशाभूल करणारी व अनर्थावह विचारसरणी प्रसृत केली आहे त्यांना आमचें एवढेंच सांगणें आहे कीं लाजेखातर चुकीच्या विचारांत लोळत पडण्यापेक्षा आपण चुकलों हें जाणून आपल्या विचारांची दिशां बदलणें यात जास्त प्रामाणिकपणा आहे याची जाणीव डॉ. आंबेडकरांना आहे. आपण चुकत आहों असें जर त्यांना वाटलें असतें तर एकतर त्यांनीं समतावाद सोडून दिला असता, किवा प्रस्तुत मागंणी मागितली नसती. पण त्यांच्या मागणींत व समतेच्या तत्वांत कांहीं विरोधः नाही हें ते जाणून आहेत. परिस्थितींतील विषमतेकडे न पाहतां रोगी निरोगी, गरीब श्रीमंत, पुढारलेले मागासलेले, बहुसंख्य अल्पसंख्य यांना सारखेपणानें वागविले पाहिजें असें मानणारें वेडगळ "समतावादी ' ते असतें, तर अस्पृश्यांसारखा दलितसमाज व स्पृश्यांसारखा सत्ताधारी समाज यांच्यांत कोणताही भेदभाव त्यांनी केला नसता व जिच्यायोगे अस्पृश्यसमाज स्पुश्यसमाजाशीं ठुल्यबल होईल अशी मागणीही त्यांनी मागितली नसती.

आणि या मागणीवर जे आक्षेप घेतात त्यांच्या मनाचा संताप व्हावयाला वास्तविक कारण येथेंच आहे. डॉ. आंबेडकरांच्या उक्ती-कृतींतील दिखाऊ विसंगतता हा या आक्षेपकांचां निव्वळ दाखवायचा दांत आहे. त्यांच्या मनाला जी गोष्ट लागून राहिली आहे ती ही कीं

डॉ. आंबेडकरांच्या मागणीने स्पृश्य व अस्पृश्य हे राजकारणांत समान

अधिकारी होणार आहेत.

आणि स्पृश्यवर्गीयांना हेंच नको आहे. कारण अस्पृश्यसमाज राजकारणांत समानाधिकारी होण्यांत स्पृश्यांच्या चातुर्वर्ण्यात्मक सनातनधर्माचे मरण आहे. एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर वर्चस्व रहाणें हें या चातुर्वर्ण्याचें मर्म आहे. या चातुर्वर्ण्याविरुद्ध आजवर अनेक बंडें झालीं. त्यांत महाराष्ट्रांतील भागवतधर्मी साधूसंतांचें बंड प्रमुख होय. पण या बंडांतील लढा अगदी निराळा होता. मानवी