8
अस्पृश्य समाजाला अस्पृश्यता, ब्राह्मणी धर्सपद्धती व
तज्जन्य भेदप्रिय मनोवृत्ती नष्ट करावयाची आहेत
श्री. प्र. ना. उबाळे यांजकडून अस्पृश्य समाजाला उद्देशून आलेला खिस्त जयंतीचा संदेशा आम्हीं गेल्या अंकांत छापला होता. श्री. उबाळे यांनी हा संदेश अत्यंत सद्धेतुपुरस्सर व कळकळपूर्वक पाठविला आहे यांत शंका नाहीं. पण सद्धेतुपुरस्सर व कळकळपूर्वक केलेल्या सर्व गोष्टी दोषरहीत. असतात असें मात्र कोणीच म्हणणार नाहीं. सद्धेतुपूर्ण विचारसरणी सदोष असूं शकते व श्रीं. उबाळे यांच्या या संदेशांतील विचारसरणींत अशाच कांहीं चुका राहून गेल्या आहेत, कीं तों प्रसिद्ध करतांना त्या चुका दाखवून दिल्याशिवाय संपादक या नात्यानें आम्ही आपलें कर्तव्य केले असे होणार नाहीं. श्री. उबाळे येशु खिस्ताचे अनन्य अनुयायी आहेत व त्यांच्या संदेशामुळें त्यांच्या अनुयायांचें सर्व दृष्टीनीं कल्याण झालें असें त्याना वाटत आहे. हा प्रश्न वैयक्तिक श्रद्धेचा असल्यामुळें आम्हांला त्या बाबतींत कांही लिहिण्याचें कारण नाहीं. त्याचप्रमाणें, ज्या तत्वावर आपला विश्वास आहे, तें इतरांनीही घ्यावें अशी इच्छा पूर्णपणें स्वाभाविक असल्यामुळें, ख्रिस्त धर्माचे अनुयायी होण्याची जी सूचना श्री. उबाळे यांनी अस्पृश्यांना केली आहे, तिच्यावरही आम्हीं आक्षेप घेऊं शकत नाहीं. आम्हांला एवढेंच सांगायचें आहे की ज्या पायावर श्री. उबाळे अस्पृश्यांना येशूचे शिष्य होण्याचा उपदेश करीत आहेत तो पायाच मुळी चुकीचा आहे
श्री. उबाळे हे अत्यंत भाविक व धार्मिकवृत्तीचे. गृहस्थ दिसतात. आपल्या संदेशांत त्यांनीं धर्म या विषयावर जितका जोर दिला आहे तितका सामाजिक हक्कांवर दिला नाहीं. पण अस्पृश्य समाजाची चळवळ ही श्री. उबाळे म्हणतात त्याप्रमाणें पापमुक्ती व ईश्वरप्राप्ति साधण्यासाठी नसून ती सामाजिक इक्क साधण्यासाठी आहे. पापमुक्ती व ईश्वरप्राप्तीसाठीं सामुदायिक चळवळ करण्याची आवश्यकता आहे असें कोणीही म्हणणार नाहीं. कारण समाजच्या समाज केव्हांही पापी नसतो. पण अस्पृश्यांची चळवळ पापमुक्ती व ईश्वरप्राप्ती यांसाठी आहे असें थोडावेळ गृहीत धरलें व यांसाठीं मध्यस्थाची गरज आहे असें मानलें, . तरीही त्यासाठीं येशू खिस्ताला मध्यस्थ केल्याशिवाय गत्यंतर नाहीं असें आम्हांला
1 : पाहा परिशिष्ट क्रमांक : ३