अस्पुश्य समाजाला अस्पृश्यता, ब्राह्मणी धर्मपद्धती व तज्जन्य भेदप्रिय मनोवृत्ती नष्ट करावयाची आहेत. - Page 80

3¢ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

वाटत नाहीं. येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीबद्दल व बोले तैसा चाले या सदरांतील त्याच्या वर्तणुकीबद्दल प्रत्येकाला आदरच वाटला पाहिजे. पण त्याच्याशिवाय दुसरा मध्यस्थ नाहीं. हें म्हणणें अत्यंत. भाविकपणाचें असले तरी निराधार आहे. येशूने आपल्या अनुयायांना दिलेल्या आश्वासनांची जंत्री श्री. उबाळे यांनीं उद्धृत केली आहे; व तशा प्रकारची आश्वासने दुसऱ्या कोणीं दिलीं आहेत काय असा त्यांचा सवाल आहे. या सवालाचें उत्तर देण्यास भगवद्गीता समर्थ आहे. पापमुक्ती विषयीं बोलावयाचे झाल्यास 'सर्व धर्मान्‌ परितज्य मामेकं शरणं ब्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ' असें आश्वासन भगवद्गीतेत आहे. तसेच ज्याप्रमाणे मी मुक्तीदाता आहे असे येशूखिस्त जाहीरपणे सांगतो, त्याचप्रमाणें ' मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ' असे कृष्ण भगवद्गीतेंतून सांगत आहे व स्वतः अज-अनादि असा लोकमहेश्वर असल्याचेही तो गर्जत आहे. आणि ही सर्व आश्वासने त्यानें विशिष्ट वर्गासाठी देऊन ठेवली आहेत असेंही नाहीं. ' स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा: ' त्यायोगें परागतीला जाता असें त्याचें आश्वासन आहे. कष्टी व भाराक्रांत लोकांना उद्देशून येशूने दिलेल्या आश्वासनांपेक्षां हीं आश्वासनें कमी दर्जाची आहेत असें कोण म्हणेल ? भगवद्‌गीतेप्रमाणेंच हिंदूंची लहान सहान पोथ्यापुराणें उघडून पाहिलीं तरी त्यांच्याशेवटी त्यांच्या वांचकांना दिलेंली पारमार्थिक मोक्षाचींच नव्हे तर ऐहिक सुखसमृद्धिची व संततिसंपत्तिलाभाची आश्वासने मुबलक आढळून येतात. आणि बायबलातील आश्वासने जर अमोघ मानायची तर हीं आश्वासनेंही तशी मानायला कोणतीच हरकत नाहीं.

पण खरें पांहू जातां अस्पृश्य समाजाला असल्या आश्‍वासनांची खातरजमा देण्यांत काय अर्थ आहे तें आम्हांला कळत नाहीं. अस्पृश्य समाज पापी आहे ही समजुतच मुळीं खोटी आहे. त्याची अस्पृश्यता हा पापाचा परिणाम नसून तो जेत्यांनीं जितांना पूर्णपणें नेस्तनाबूद करण्यासाठीं त्यांच्यावर टाकलेला सामाजिक बहिष्कार आहे. असे असल्यामुळे अस्पृश्यांना पापमुक्तीसाठी धडपडण्याची व त्यासाठीं योग्य मध्यस्थ किंवा देवाघरचा वाटाड्या शोधण्याची काय गरज ? आणि अस्पृश्य समाजांत ज्या व्यक्ती पापी असतील, त्यांना हिंदू राहूनच पापमुक्ती व ईश्वरप्राप्ति साधतां येईल. मोक्ष मिळविण्याच्या आड अस्पृश्यता येत नाही, असें हिंदु लोकाचे अस्पृश्यांना आश्वासन आहे. चोखामेळा, रोहिदास वगैरे संतांनी, अस्पृश्य असूनही मोक्ष मिळविला; व आज जर सगळे अस्पृश्य ' पंढरीचिया वाटा | मोक्ष लाभे हातोहाता ' असें टाळ मृदंगाच्या गजरांत ओरडत मोक्षाच्या वाटेला लागतील तर हिंदु त्यांच्या आड मुळींच येणार नाहींत, ही सर्व परधर्मीयांनीं खात्री बाळगावी. पण खुबी ही आहे कीं तेच अस्पृश्य