अस्पृश्य समाजाला अस्पृश्यता, ....... नष्ट करावयाची आहेत ३९
हिंदूंच्या ' खासगीमालकी ' च्या एकाद्या तलावावर पाणी भरायला जाऊं द्या, अगर सरकारी शाळांतून आमच्या मुलांना तुमच्या मुलांत बसवा असा आग्रह धरू द्या, कों भूतलावरची महान् हिंदु जातच नव्हे तर आकांशपाताळांतील तेहतीस कोटी देवांची वसाहत लाठीबंद होऊन अस्पृश्यांना मारायला धांवत येईल. रत्नागिरी स्कूल बोर्डाच्या ठरावानुसार तेथील अस्पृश्यानीं आपंलीं मुले स्पृश्यांच्या मुलांबरोबर बसावयास पाठविल्यामुळें त्यांच्यावर देव कोपला अशा प्रकारची हकीकत रत्नागिरीच्या ' सत्यशोधकां'त प्रसिद्ध झांली होती. ती या ठिकाणीं विचारांत घेण्यासारखी आहे.
मोक्षप्राप्तीसाठीं अस्पृश्यांनी चळवळ केली तर त्यांच्याविषयीं सहानुभूति बाळगणारे हिंदू व देव सामाजिक हक्क प्राप्तीसाठी झगडणाऱ्या अस्पृश्यांवरच इतके कोपायमान कां होतात हा प्रश्न खरोखरच विचारार्ह आहे. या प्रश्नाचें उत्तर ज्याला उमगेल, व हिंदूंच्या व देवांच्या या विसंगत वर्तनाचें इंगित ज्याला कळेल त्याला ब्राह्मणी धर्मपद्धतींचें रहस्य समजलें असें म्हणावयास हरकत नाहीं. हिंदूंचीं धार्मिक तत्त्वें मोठीं उज्वल आहेत, पण त्यांच्या सामाजिक व्यवहाराचें त्या तत्त्वांपासून खास पुणेंरी पद्धतीनें विभक्तीकरण केलेलें आहे. यामुळेच सर्वाभूतीं भगवंत या तत्त्वाच्या पोपटपंचीबरोबर अस्पृश्यांवरचा सामाजिक बहिष्कार हिंदु समाजांत आढळून येतो. दलितांनीं सामाजिक बंड पुकारूं नये म्हणून त्यांच्या डोळ्यांपुढे मोठमोठीं तत्त्वें आमिषादाखल ठेवण्यांत आलीं आहेत. हें या तत्त्वविरोधी व्यवहारचें मर्म आहे. पुष्कळ काळापर्यंत स्पृश्यांच्या ध्यानांत हा कावा आला नव्हता. पण आतां त्यांना तो कळला आहे व आपले सामाजिक हक्क मिळवण्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली आहे. धर्मांतराचा त्यांना उपदेश करायचा झाल्यास तो याच पायावर करणें योग्य होईल. खिस्ती धर्मांत सर्व मानवांना सारखे हक्क व सारख्या संधों आहेत म्हणून तुम्हीं त्या धर्मांचे अनुयायी व्हा या म्हणण्याला अस्पृश्य समाजांत एकदम होकार न मिळाला तरी मान मिळेल. पण पापमुक्तीसाठीं, ईश्वरप्राप्तिसाठीं व योग्य मध्यस्थासाठीं तुम्हीं खिस्ती व्हा हैं म्हणणें मात्र कोणालाही पटणार नाही, कारण हिंदुधर्मात राहून त्यांना या गोष्टी साध्य आहेत.
डॉ. आंबेडकर अगर अस्पृश्य धर्मांतराला भितात असा गैरसमज यावरून श्री. उबाळे यांनीं करून घेऊं नये. त्यांना एवढेंच वाटतें कीं धर्मातराने त्यांच्या चळवळींचा हेतु साध्य होण्यासारखा नाहीं. स्वतःपुरती अस्पृश्यता नाहींशी करणें एवढेंच जर त्यांच्या चळवळीचे ध्येय असतें तर धर्मातराने तें त्वरित साध्य झाले असतें. पण अस्पृश्य समाजाला एवढेंच कार्य करावयाचें नसून त्याला ब्राह्मणी