अस्पुश्य समाजाला अस्पृश्यता, ब्राह्मणी धर्मपद्धती व तज्जन्य भेदप्रिय मनोवृत्ती नष्ट करावयाची आहेत. - Page 82

४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर awa आणि भाषणे

धर्मपद्धती व-तत्जन्य भेदप्रिय मनोवृत्ती हीच नष्ट करावयाचीं आहेत. खिस्ती झाल्यानें ही. पद्धती व ही मनोवृत्ती नष्ट होत नाहींत. कारण ख्रिस्ती झालेल्या लोकांतही ब्राह्मण खिस्ती, मराठा खिस्ती असे भेदभाव आहेत. म्हणून खिस्ती होण्याच्या यातायातींत न पडता, हिंदू राहूनच ब्राह्मणीधर्म नाशाची चळवळ करणें श्रेयस्कर असें आम्हांला वाटतें. आणि स्वतःपुरत्या अस्पृश्यतेविषयी बोलायचे झाल्यास तिच्यापासून पळून जाण्यापेक्षां तिच्याविरूद्ध उघड उघड लढा घेऊन तिला नेस्तनाबूद करणें यांतच मर्दपणा आहे असें कोणीही म्हणेल.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत,. ता. १ फेब्रुवारी १९२९.