देह मारणाऱ्यापेक्षां मने मारणारे जास्त भयंकर - Page 83

Go

देह मारणाप्यापेक्षा मने मारणारे जास्त भयंकर

अस्पृश्योद्धारक म्हणून मिरविणारे पुण्याचें माटे मास्तर यांच्या अस्पृश्योद्धारांत कोणता ब्राह्मणी कावा भरलेला आहे तो आम्हीं यापूर्वीच वाचकांच्या निदर्शनास आणून दिला आहे. ब्राह्मणेतरांविरूद्ध ब्राह्मणांचा पक्ष बळकट करण्याच्या हेतूंने अस्पृश्यांना गोंजारणाऱ्या या माटे मास्तरांचें नुकतेंच पुणें येथे चातुर्वर्ण्य या विषयावर व्याख्यान झालें. त्यांत ते असें म्हणाले की हल्लींच्या इंग्रजांच्या राज्यापेक्षां पेशव्यांच्या राज्यांत अस्पृश्यांना सवलती जास्त होत्या. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं माटे मास्तरांनी या अद्भुत शोधाचे जनकत्व स्वतःकडे घेतलें नसून तें एका 'अस्पृश्य पुढाऱ्या' च्या माथी मारलें आहे. एक अस्पृश्य पुढारी आपल्याला असें सांगत होता असें ते म्हणाले आहेत व तें खरें आहे असा शेरा त्यांनी मारला आहे. हा शोध लावणाऱ्या 'अस्पृश्य पुढाऱ्या' चें व तो जगापुढें आणणाऱ्या माटे मास्तरांचें आरंभीच अभिनंदन करून आम्ही त्यांना एवढेंच कळविण्याची परवानगी घेतों कीं ' बाबांनों तुमचे हें श्रम व्यर्थ आहेत.' त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतका अस्पृश्य समाज सध्या तरी बेअकली राहिला नाहीं व तो तसा राहिला आहे असें मानण्याचा बेअकलीपणा तुम्हीही करूं नये अशी आमची इच्छा आहे.

हा शोध माटे म्हणतात त्या प्रमाणे खरोखरच एका अस्पृश्य पुढाऱ्याचा आहे कीं माट्यांनीच तो एकाद्या बेअकली अस्पृश्याला नामधारी पुढारीपणाची लालुच

दाखऊन त्यांच्या गळ्यात बांधला आहे हें आम्हांला नक्की सांगता येत नाही. पण

असा एकादा अस्पृश्य पुढारी त्यांना भेटला नसेल असे मात्र आमच्यानें म्हणवत नाहीं. आणि हा अस्पृश्य पुढारी बहुत करून सकट असावा. आपल्या गुरुमाऊलीला संतुष्ट करण्यासाठी असले बोल बोलण्याची तयारी आज सकटाशिवाय कोणाही अस्मृश्याची नाही असें म्हणणे वस्तुस्थितीला फारसें सोडून होईल असें आम्हांस वाटत नाहीं. पण हा प्रश्‍न बाजूला सोडला व माटे मास्तरांचा ' अस्पृश्य पुढारी ' म्हणतो त्याप्रमांणे आंग्लाईपेक्षां पेशवाईत अस्पृश्यांना जास्त सवलती होत्या असे मानलें तरी तेवढ्यावरून पेशवाईतील अस्पृश्यांची स्थिती कशी स्पृहणीय ठरते हें आम्हांला कळत नाहीं. माट मास्तरोनी किता त्यच्या ठरते हें आम्हांला कळत नाहीं. माटे मास्तरांनी किवा त्यांच्या

† :पाहा, परिशिष्ट क्रमांक ८, खंड १९.