देह मारणाऱ्यापेक्षां मने मारणारे जास्त भयंकर - Page 85

४३ देह मारणाय्यापेक्षां मनें मारणारे जास्त भयंकर

शारिरीक असतो आणि अस्पृश्यांचा मानसिक असतो. आणि त्याचे पर्यवसान

अस्पृश्यांनी आपली पायरी सांभाळून पुष्कळ वेळा शारिरीक छळांतही होतें.

चांगले कपडे नयेत, राहावें, त्यांनीं वर येण्याचा प्रयत्न करूं नये, त्यांनीं घालूं

त्यांच्या बायकांनी चांगले.दागिने लेवूं नयेत वगैरे स्पृश्यांच्या इच्छा अस्पृश्यांच्या

मानसिक छळांत जमा होतात; आणि अस्पृश्य लोक ही पायरी सोडूं लागले म्हणजे त्यांच्या शारिरीक छळास सुरुवात होते. असल्या छळाचीं उदाहरणे आमच्या वाचकांच्या पूर्ण परिचयाचीं आहेत. अस्पृश्य जोपर्यंत आपल्या पायरीवर आहेत तोंपर्यंत स्पृश्य त्यांच्या वाटेला जावयाचे नाहींत. पण ते आपली पायरी सोडूं लागले तर त्यांना त्यांच्याच पायरीवर ठेवण्यासाठी स्पृश्य लोक त्यांचा वाटेल तसा छळ करितील. निग्रोंना गोरे छळतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी. पण अस्पृश्यांनी आपली पायरी सोडण्यांत स्पृश्यांची स्वार्थहानीं नसली तरी ते त्यांचा छळ करितात. म्हणजे अस्पृश्यानी हीन स्थितींत राहणें हे स्पृश्य स्वतःच्या मोठेपणाचें गमक समजून चालतात. गोऱ्यांच्या व स्पृश्यांच्या मनोवृत्तीत हा मोठा फरक आहे. गोऱ्या लोकांनीं निग्रो लोकांचे देह मारले असले तर स्पृश्यांनीं अस्पृश्यांची मनें मारिलीं आहेत. आणि देह मारणाय्यापेक्षां मनें मारणारे जास्त

भयंकर असेंच कोणीही म्हणेल.

E थल विकि

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९.