१२
नं धनिकाकडून घेतलेल्या रकमेची परतफेड करता
त्यांतून सोय लावावी विपद्ग्रस्तांची
पंजाबांत सध्यां एक विलक्षण सत्याग्रह चालू आहे. सत्याग्रह म्हटल्याबरोबर
म. गांधींच्या सत्याग्रहाची कल्पना डोळ्यापुढे येते. पण आम्हीं उल्लेखिलेला सत्याग्रह अशा प्रकारचा नसून तो सैनिकांचा सत्याग्रह आहे. लाहोरच्या आसमंतात राहणारे मुसलमान, शीख वगैरे माजी सैनिक व महायुद्धांत
धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची बायका मुलें मिळून सुमारे ५-६ हजार लोकांनीं हा सत्याग्रह चालविलेला आहे. महायुद्धांतून जे सैनिक जिवानिशीं परत आले
त्यांच्या पलटणींना सरकारनें रजा दिल्यामुळें ते बेकार झाले, व जे महायुद्धात कामास आले त्यांची बायकामुलें विपदग्रस्त. झालीं. या लोकांच्या पोटापाण्याची सोय लावणें सरकारचे कर्तव्य आहे. पण आजवर सरकारनें हैं कर्तव्य आंगाबाहेर टाकल्यामुळे, प्रस्तुत सत्याग्रह सुरू झाला आहे. आपल्याला जमिनी पाहिजेत अशी या लोकांची सरकारकडे मागणी आहे. ही मागणी पूर्ण करणें सरकारला जर शक्य नसेल, तर तिच्याऐवजी दुसरी कांहीं [व्यवस्था ] करून या विपन्न लोकांची तरतूद. सरकारनें केली पाहिजे. महायुद्धात धनिक लोकांकडून सरकारनें ज्या रकमा घेतल्या, [त्यांची ] [कर्ज ] [म्हणून ] [सरकार ] [आतां ] परतफेड करीत आहे. पण तें कर्ज समजून न चालतां ती सरकारला मदत आहे. असें सरकारनें समजावें; व त्याची परतफेड [करण्याच्या ] [भरीस ] [न ] [पडतां ] त्यांतून या विपद्गस्त लोकांची सोय लावावी, [हा ] [याबाबतींत ] [एक ] [उपाय ] [आहे. ]
७७४
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९.
बाय ६४१- ६