मुंबई म्युनिसिपालिटीतले लोकप्रतिनिधी - Page 89

१४
मुंबई म्युनिसिपालिटीतले लोक प्रतिनिधी

थोड्या दिवसांपूर्वी मुंबई म्युनिसिपालिटींतले शहराच्या वेगवेगळ्या वॉर्डाचे प्रतिनिधी निवडण्यांत आले. दरमहा दहा रुपये किंवा त्यापेक्षां अधिक घरभाडे देणाऱ्या लोकांना मताधिकार मिळाल्यापासून साधारण लोकसमुदायामध्यें म्युनिसिपालिटींतल्या लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यासंबंधानें थोडीबहुत चर्चा होऊं लागली आहे. खरें पाहिलें असतां म्युनिसिपालिटीच्या कारभारासंबंधाने श्रीमंत लोकांपेक्षा मध्यम व गरीब स्थितींतल्या लोकांनाच अधिक अगत्य वाटलें पाहिजे. मध्यम व गरीब वर्गातल्या लोकांच्या जीविताचा आणि म्युनिसिपालिटीचा अगदीं निकट संबंध आहे. स्वच्छता, आरोग्यरक्षण, औषधोपचाराची व्यवस्था, पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, घरांची रचना, खेळण्याच्या व फिरण्याच्या सार्वजनिक जागा वगैरे कामें म्युनिसिपालिटीच्या कार्यक्षेत्रांत येतात. श्रीमंत लोकांना यांतल्या बऱ्याचशा गोष्टींकरितां म्युनिसिपालिदीवर अवलंबून राहावें लागत नाहीं. मलबार हिल, खंबाला-हिल, पेडर रोड, अशांसारख्या हवाशीर ठिकाणीं मोठमोठ्या. बंगल्यांत राहणाऱ्या लोकांना स्वतःच्या सर्व सोयी करून घेतां येतात. साफसुफी, स्वच्छता ठेवण्याची साधनें त्यांना पैशामुळे उपलब्ध असतात. औषधोपचाराची व्यवस्था मोठमोठ्या डॉक्टरांना त्यांची जबर फी देऊन सधन लोकांस करुन घेतां येते. प्राथमिक शिक्षणांसाठी त्यांच्या मुलांवर कोणी सक्ति करावयास नको असते. आपल्या मुलांच्या शिक्षणांसाठीं हवा तितका पैसा खर्च करणें त्यांना शक्य असतें. त्यांना खेळण्यासाठी बंगल्याच्या आवारांत किंवा क्लबांमध्यें भरपूर जाया मिळू शकते आणि हवा खाण्याच्या जागा कितीही लांब असल्या तरी ते मोटारीतून किंवा गाडींतून बसून तेथें सहज जाऊं शकतात. उलट पक्षी, शहराच्या गचडीच्या भागांत चाळींमधील लहान लहान खोल्यांत राहणाऱ्या मध्यम व गरीब स्थितींतील लोकांना स्वतःच्या सोयी स्वत: करणें शक्य नसतें. त्यांचें जिवित जर सुखावह झालें पाहिजे तर म्युनिसिपालिटीसारख्या सार्वजनिक संस्थांनींच त्यांच्या सोयीसुखांकडे लक्ष दिलें पाहिजे, परदुःखानें दुःखित. होणारे लोक जगांत केव्हांही विरळाच असावयाचे. अर्थात्‌ म्युनिसिपालिटीचा कारभार मध्यम व गरीब वर्गाच्या प्रतिनिधींच्या carta चालला पाहिजें, म्युनिसिपालिटीमध्यें बहुमत मध्यम व गरीब वर्गातल्या लोकांच्याच प्रतिनिधींचें असलें पाहिजें, हें उघड होय. गरिबांची दुःखें