मुंबई म्युनिसिपालिटीतले लोकप्रतिनिधी - Page 90

Yé डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

गरिबांनाच चांगल्या रीतीनें ठाऊक असावयाचीं. कदाचित्‌ स्वतःची स्थिती गरिबीची नसली तरी गरिबांच्या सुखदुःखांची खऱ्या लोकप्रतिनिधींना माहिती असली पाहिजे, गरिबांविषयीं सहानुभूति वाटली पाहिजे, आणि गरिबांची बाजू कॉर्पोरेशनमध्ये जोरकसपणानें मांडून त्यांना गरिबांचे हित साधतां आलें पाहिजे.

उमेदवारांची लायकी व मतदारांची मतें

म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये निवडून येण्याकरितां जे उमेदवार उभे राहतात त्यांची मतें मिळविण्यासाठी मोठी धडपड चालते. आजकाल मुंबई म्युनिसिपालिटींत निवडून येणें साधारण स्थितींतल्या उमेदवारांना कठीण झालें आहे. मतें मिळविण्यांकरितां.बराचसा खर्च करावा लागतो. श्रीमंत उमेदवार मतें विकत घ्यावयाससुद्धां तयार असतात. परंतु मतें विकत घ्यावयाचीं नसलीं तरी तीं मिळविण्यांकरितां जे प्रयत्न करावे लागतात ते खर्चाचे असतात. कॉर्पोरेशनमध्ये निवडून आल्यावर वेगवेगळ्या लटपटी करून ज्यांना स्वतःचा कांहीं आर्थिक फायदा करून घ्यावयाचा नसतो अशांना कॉर्पोरेशनमध्यें निवडून येणें म्हणजें गांठचें खाऊन ved नोकरी करण्यासारखेंच होतें. अर्थात्‌ कॉर्पोरेशनमध्ये जाऊन लोकसेवा करण्याची लायकी अंगी असतांही साधारण स्थितींतले लोक उमेदवार म्हणून उभे राहावयास धजत नाहींत. उलटपक्षीं, अंगी म्हणण्यासारखी कांहीं लायकी नसतांही कित्येक लोक पैशाच्या जोरावर मानासाठी हपापून उमेदवार म्हणून उभे राहतात. म्यु. कॉर्पोरेशनमध्ये लोकहित साधण्याचे काम करण्याला जे गुण अवश्य असतात ते म्यु. कॉर्पोरेशनमध्ये निवडून येण्यास लागणाऱ्या गुणांपेक्षां वेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळें, निवडून आलेले उमेदवार नेहमीं लायकच असतात असें नाहीं, किंबहुना नालायक. पण यशस्वी उमेदवारांची संख्या नेहमी बरीच मोठी असल्याचें दिसून येतें. मुंबई म्युनिसिपालिटींत वेगवेगळे पक्ष, त्यांचीं वेगवेगळीं धोरणें व वेगवेगळे कार्यक्रम नाहीत म्हटलें तरी चालेल. नांवाला कांहीं पक्ष आहेत, परंतु त्यांत तत्वाचा भाग फारच थोडा असून निवडंणुकीच्या वेंळी तर मतदारांपुढे ते पक्ष योग्य रीतीने मुळीच मांडले जात नाहीत. खाजगी प्रयत्नांनींच मतें मिळविण्यांत येतात. गेल्या निवडणुकीत जाहीर सभांच्या द्वारें मतदारांची मनें वळविण्याचें प्रयत्न किती थोडे झाले तें मुंबई शहरातल्या लोकांना ठाऊकच आहे. पक्ष, धोरण, कार्यक्रम, जाहीर सभा, जाहीर आश्‍वासने यांच्या अभावी मतदारांना नागरीकत्वांचीं कर्तव्यें, हक्क व जबाबदारी यांच्या संबंधानें जें शिक्षण मिळणें अवश्य आहे तें मिळत नाहींच, परंतु मतदारांची दिशांभूल होऊन कसलेही रद्दी उमेदवार निवडून येऊ शकतात. कित्येक लोक तर मुंबईच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधले कायमचे वतनदार बनलेले आहेत. ते नेहमीं गरीब लोकांच्या हिताच्या आड येणारे असोत,