मुंबई म्युनिसिपालिटीतले लोकप्रतिनिधी - Page 91

मुंबई म्युनिसिपालिटीतले लोक प्रतिनिधी ४९

माना नंदीबैल अंसोत, पुरस्कर्ते असोत, केवळ हालवणारे पुच्छप्रगतीच्या धोरणाचे

वर्षासहा मूकस्तंभ असोत अथवा कॉर्पोरेशन हॉलमध्ये कधीं तोंड न उघडणारे

यावयाचेच. वर धूमकेतू असोत, दरखेपेला ते निवडून महिन्यांतून तोंड दाखविणारे

सांगितलेल्या प्रकारचे कांही सभासद सरकारनें नेमलेले असतात. तथापि,

आम्हांला त्यांच्याबद्दल तेवढें आश्चर्य वाटत नाहीं ; परंतु वार्डाच्या निवडणुकींतूनहि

तसले लोक पुनः पुनः निवडून येऊ शकतात हीच विशेष आश्चर्याची व खेदाची गोष्ट समजली पाहिजे. इकडील मतदारांमध्ये अद्यापि आपल्यावरील जबाबदारीची

जाणीव व्हावी तशी उत्पन्न झालेली नाहीं याचीच ही साक्ष होय.

जात्याभिमानाचें बंड

बऱ्याचशा निवडी जातिमेदाच्या तत्त्वावर होत असतात. ज्या उमेदवाराच्या जातीच्या मलदारांची संख्या फार लहान असेल तो खरोखरच तितका नांवाजलेला व सर्व शहरांत अतिशय लोकप्रिय असा असल्याखेरीज अथवा पगारी एजंट ठेवून मतें विकत घेण्याची ऐपत त्याला असल्याखेरीज त्याला निवडणुकीत यशस्वी होणें शक्य नाही. मतदारांचा ओढा स्वाभाविकपणे आपल्या जातींच्या उमेदवारांकडे असतो. आपल्या जातीचा प्रतिनिधी म्युनिसिपालिटोंत बसणें हे आपल्या जातीला एक भूषण आहे असें पुष्कळांना वाटतें. जात्याभिमानापुढे उमेदवाराच्या लायकी-नालायकीचा विचार फारच थोड्या लोकांच्या मनांत येतो. जातिभेदाचे

बंड माजविणाऱ्या उमेदवारांना उदारमतवादी उमेदवारांपेक्षां अधिक मतें मिळतात

आणि उदारमतवादी उमेदवार निवडणुकीत पडतातही. म्युनिसिपालिटींच्या

प्राथमिक शाळांमध्ये बहिष्कृत वर्गातल्या विद्यार्थ्यांकरितां पिण्याच्या पाण्याची भांडीं

वेगळी असावी किंवा पंक्तिप्रपंच असूं नये असा प्रश्न निघाला असतां

कॉर्पोरेशनमध्ये कडाक्याचा वादविवाद झाला व सभासदामध्यें तीव्र मतभेद

झाला. या वादविवादाचा गेल्या निवडणुकामध्यें कित्येक वार्डात परिणाम पुष्कळ

झाल्यांचें दिसून आलें. वरील प्रश्नामुळे गुजराथी लोकांत तर अतिशय खळबळ

उडाली होती. रा. लखमीदास तेरसी हे समाजसुधारणा पक्षाचे असल्यामुळे

त्यांनीं पंक्तिप्रपंच क़रण्याविरुद्ध मत दिलें होतें. त्याबद्दल जुन्या सत्ताच्या

सोंवळ्या लोकांनी त्यांच्यावर गिल्ला केला आणि त्यामुळे ते निवडणुकीत यशस्वी

झाले नाहींत. जी वार्डात डॉ. जावळे व रा. पी. जी. सहस्त्रबुद्धे यांना सोवळ्या

लोकांनीं विशेषत: ब्राह्मणांनी निवडून दिलें. या दोन उमेदवारांच्या बाबतींत

दादर भागातल्या सोवळ्या ब्राह्मणांनी हस्तपत्रके वांटून ते जुन्या मताचे अभिमानी

आहेत यासाठींच सर्वानी त्यांना मतें देऊन निवडून आणावें अशी चळवळ केली

होती. डॉ. जावळे हे सरकारपक्षाचे म्हणून प्रसिद्ध असतां केवळ त्यांनीं

कॉर्पोरेशनमध्ये सोवळेपणाचा पुरस्कार केला आणि अस्पृश्यतानिवारणाच्या