५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कार्यात ते आडवे आले एवढ्यासाठींच राजकीय बाबतींत जहाल मताचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणांनीही त्यांना आपलीं मतें दिली. दादर भागांतल्या एका पुलाला कै. टिळकांचे नांव द्यावें अशी सूचना कॉर्पोरेशनमध्ये आणणें एवढीच ज्यांची कामगिरी त्या सहस्त्रबुद्धयांना ते जातीनें ब्राह्मण आणि त्यांतही सुधारणेचे विरोधी म्हणूनच त्यांच्या जातभाईँनी मतें दिली आणि त्यांच्याकरितां इतरांचींही मतें मिळविलीं. यावरून अद्यापि मुंबईसारख्या शहरांतल्याही म्युनिसिपल निवडणुकी कशा रीतीनें होतात आणि शिकलेल्या वर्गातले लोकही आपला मतदानाचा हक्क कोणत्या धोरणाने बजावतात तें दिसून येतें.
हिंदु, मुसलमान व पारशी समाजांतील यशस्वी उमेदवार.
मुंबई शहरांतील लोकसंख्येपैकी शेंकडा १६ टक्के वस्ती मुसलमानांची असतां ७६ जागांपैकी १४ जागा म्हणजे शेंकडा १८ टक्के जागा त्यांच्या वांट्याला आल्या. पारशांची लोकसंख्या मुंबईत शेंकडा फक्त ७ टक्के असतां त्यांनीं १८ जाया म्हणजे शेंकडा २४ टक्के जागा मिळविल्या. पारशी व मुसलमान उमेदवारांमधील कित्येक सधन उमेदवारांनी जो खर्च केला होता व जे शिकस्तीचे प्रयत्न केले होते त्यांच्यामुळे त्यांना आपआपल्या जातीच्या मतदारांखेरीज इतर विशेषतः हिंदु मतदारांची मतें मिळालीं. जातिभेदाप्रमाणें धर्मभेदहि मनांत न आणतां मतदारांनी केवळ उमेदवाराची लायकी व आंत्तापर्यंतची त्याची सार्वजनिक कामगिरी यांच्याचकडे लक्ष्य देऊन आपलीं मतें द्यावी हें अर्थातच स्पृहणीय होय. परंतु सर्व हिंदु मतदारांनी हैं उदात्त तत्त्व दृष्टीपुढे ठेऊन आपलीं मतें दिलीं असे मात्र म्हणावयास आम्ही तयार नाहीं.
अस्पृश्यांची स्थिती.
हिंदुसमाजानें आपल्याच धर्मातला जो एक मोठा वर्ग अस्पृश्य मानलेला आहे त्या वर्गाचा प्रतिनिधी सध्यांची व्यवस्था चालू असेपर्यंत तरी मुंबईच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कोणत्याच वॉर्डात निवडून येणें शक्य नाहीं असें म्हटलें तरी चालेल. एक तर सध्यां मताधिकार दरमहा दहा रुपये किंवा त्यापेक्षां अधिक घरभाडे देणारांना आहे. त्यामुळे मुंबई शहरांत बहिष्कृत वर्गातील मतदारांची संख्या त्या वर्गातील लोकसंख्येच्या मानाने अतिशय अल्प आहे. या वर्गातील लोक सर्वात दरिद्री असल्यामुळे दरमहा दहा रुपये भाडें देण्याचें सामर्थ्य हजारांत
एकालाच असतें. शिवाय, या वर्गातील लोकांची वस्ती शहरांच्या वेगवेगळ्या
भागांत पांगलेली आहे. तिसरी गोष्ट ही की, या वर्गातल्या मतदारांमध्येहि अशिक्षित व अज्ञान लोकांचा भरणा असल्या कारणानें आपल्या वर्गाच्या