हिंदु देवालयांचे संरक्षण करणरT अस्पृश्य - Page 96

१६
हिंदु देवालयांचें संरक्षण करणारे अरपृश्य !

हिंदुसमाजात बहिष्कृत वर्गाला समतेचे हक्क नाहीत इतकेच नव्हे तर परघ्र्मातल्या लोकापेक्षांही अस्पृश्याना हिंदुसमाज तुच्छ लेखीत असतो. देवळाच्या आवारात मुसलमान जाऊं शकतात, परंतु अस्पृश्यांना आसपासही पाऊल टाकतां येत नाहीं, मग देवदर्शनाची गोष्ट बाजूलाच राहिली ! अशा प्रकारें हिदुसमाजांत बहिष्कृत वर्गाची स्थिति असता मुंबईतल्या हिंदुमुसलमांनाच्या मोठ्या दंग्याच्या वेळीं त्या वर्गातील लोकांना, ते हिंदुधर्मास चिकटून राहिल्ामुळे इतर हिंदूंबरोबर मुसलमानांच्या क्रोधाला बळी पडण्याचा प्रसग आला. इतकच नव्ह तर ज्या देवालयात त्याना देवदर्शन घेण्यासही मोकळीक नसत त्या दे-.लयातल्या देवाच्या त्याना अदृश्य असलेल्या मूर्तोचिं सरक्षण करण्यासही भाय डा वगैरे भागात अस्पृश्य वगातले लोक केवळ पूर्वजांच्या धमाचा अभिमान बाळगून आणे आपल्यावर हिंदुसमाजात हात असलला जुलूम घटकाभर विसरून, हातात काठ्या घेऊन तयार झाले आणि त्यांनी अशी मदत कल्यामुळच मुचलमानांच्या हल्ल्यापासून त्या हिंदु देवालयांचा बचाव झाला. या प्रसंगा आमच्या अस्पृश्यवगीय लोकांनी आपले प्राण धाक्यांत घालण्यास मागेपुढे पाहिलें नाहीं. अस्पृश्यांनी या आणीबाणीच्या वेळी हिंदुसमाजाची जी बहुमोल कामगिरी बजावली त्याबद्दल हिंदुसांघटनवाल्यांनींही त्यांची स्तुति कली आहे. परंतु एरव्हीं त्यांना अस्पृश्यांच्या धार्मिक व सामाजिक हक्कांची कधीं आठवण होत नाहीं. अस्पृश्यांनी हिंदुधर्मांतून बाहेर जाऊ नये, हिंदुसमाजाच्या खांद्याला खांदा भिडवून परधर्मीयांशों सामना करावा, परंतु हिदुसमाजांत समतेची हक्काची मागणीं त्यांनी करूं नये, अशी या धर्माभिमानी म्हणविणाऱ्या आकुंचित बुद्धाच्या लोकांची इच्छा असते. अस्पृश्य लोक समतेची मागणी करूं लागले तर ' तुम्हांला आम्ही वागवितो तसें वागवून घ्यावयाचे असेल तर हिंदुधमाँत राहा, नाहीं पेक्षा तुम्हीं खुशाल परघर्मात जा. आम्हाला त्याची बिलकूल पर्वा नाहों ' असें उघड म्हणावयासही हे धर्माभिमानी म्हणविणारे लोक कमी करीत नाहींत. दंग्याच्या वेळीं अस्पृश्यांची हिंदुसमाजाला जरूरी होती, म्हणून मुंबईच्या कित्येक भागांत त्या दिवसांत हिदुउपहारगृहांमध्येंही अस्पृश्यांना घेण्यांत येत असे