हिंदु देवालयांचें सरक्षण करणारे अरपृश्य ! ५५
असें सांगतात. तसें असल्यास हिंदुलोकांच्या सोंवळयाच्या मतलबी लवचीकपणांची वाहवाच केली पाहिजे ! हिंदुउपहारगृहांमध्यें अस्पृश्यांना घेण्यांत येत नाहीं व त्यामुळें त्यांना मोगलांच्या, मुसलमानांच्या किंवा इराण्यांच्या हॉटेलांमध्ये जावें लागतें. ज्या लोकांना दंग्याच्या वेंळीं हिंदुउपहारगृहांमध्यें प्रवेश करता येत होता, त्यांनाही आता परत परधर्मीयांच्या हॉटेलांचा आश्रय करावा लागेल याविषयीं आमची खात्री आहे. कारण ' मरज सरो नी वैद्य मरो ! '
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ मार्च १९२९.